-
निसानने आपल्या एक्स ट्रेल या एसयूव्हीवरून पर्दा हटवला आहे. सध्या भारतात या वाहनाची चाचणी सुरू आहे. लाँच झाल्यानंतर ही एसयूव्ही फॉर्च्युनरला टक्कर देण्याची शक्यता आहे. (source – nissan)
-
जागतिक बाजारपेठेत निसान या एसयूव्हीचे ५ सीटर आणि ७ सीटर व्हेरिएंट उपलब्ध करत आहे. वाहनाचे ग्राऊंड क्लिअरंस २०५ एमएम आहे. (source – nissan)
-
भारतीय बाजारपेठेत कोणते व्हेरिएंट लाँच होणार याची कल्पना नाही. (source – nissan)
-
जागतिक बाजारपेठेत ही एसयूव्ही टर्बो पेट्रोल इंजिन, हायब्रिड इंजिनसह उपलब्ध आहे. (source – nissan)
-
ही एसयूव्ही टू व्हील ड्राइव्ह आणि ४ व्हील ड्राइव्ह प्रणालीसह विकल्या जात आहे. (source – nissan)
-
भारतीय बाजारपेठेत ही एसयूव्ही कोणत्या इंजिनसह लाँच होणार याची घोषणा निसानने अद्याप केलेली नाही. (source – nissan)
-
फीचरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास निसान एक्स ट्रेलमध्ये ऑल अराउंड एलईडी लाइटिंग, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, हेड्सअप डिस्प्ले हे फीचर देण्यात आले आहेत. (source – nissan)
-
सुरक्षेसाठी निसान एक्स ट्रेलमध्ये अडव्हान्स्ड ड्रायव्हर एड सिस्टिम (एडीएएस), अडाप्टिव्ह क्रुझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, प्रो पायलट असिस्ट, ऑटोमॅटिक हाय बिम, मल्टिपल एअरबॅग, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, मुव्हिंग ऑब्जेक्ट डिटेक्शन अलर्ट आणि बरेच काही देण्यात आले आहे. (source – nissan)
-
निसान ही सीबीएस (कम्प्लिटली बिल्ट युनिट) म्हणून भारतात येणार आहे. त्यामुळे या एसयूव्हीची किंमत अधिक असण्याची शक्यता आहे. ही एसयूव्ही, सिट्रिओन सी ५ एअरक्रॉस, टोयोचा फॉर्च्युनर आणि ह्युंडाई टक्सनला टक्कर देईल. (source – nissan)

“ती गरोदर आहे आणि…”, बापाने स्वत:च्याच मुलीशी केलं लग्न, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल