-
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्याच्या प्रारंभापूर्वी भारतीय वायुसेनेने थरारक ‘एअर शो’ सादर केला (निर्मल हरिंद्रन : एक्सप्रेस फोटो)
-
विश्वचषक अंतिम सामन्याच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाने भारताचा कर्णधार रोहित शर्मा याची विकेट घेतली. (निर्मल हरिंद्रन : एक्सप्रेस फोटो)
-
या सामन्यादरम्यान सर्व नियम तोडून ‘फ्री पॅलसेटाइन’ असा संदेश असणारा टी-शर्ट घालून खेळपट्टीवर एक व्यक्ती धावत आली. (निर्मल हरिंद्रन : एक्सप्रेस फोटो)
-
या सामन्यादरम्यान विराट कोहलीने प्रेक्षकांना अभिवादन केले (निर्मल हरिंद्रन : एक्सप्रेस फोटो)
-
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. तर १ अब्जाहून अधिक लोकांनी हा सामना विविध माध्यमांद्वारे पाहिला. (निर्मल हरिंद्रन : एक्सप्रेस फोटो)
-
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सची टिपलेली भावमुद्रा (निर्मल हरिंद्रन : एक्सप्रेस फोटो)
-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यादरम्यान भारताने स्टीव्ह स्मिथची विकेट घेत आनंद साजरा केला (निर्मल हरिंद्रन : एक्सप्रेस फोटो)
-
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्धचा क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना जिंकल्यानंतर आनंद साजरा करताना ट्रॅव्हिस हेड(निर्मल हरिंद्रन : एक्सप्रेस फोटो)
-
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्धच्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आनंद साजरा करताना… (निर्मल हरिंद्रन : एक्सप्रेस फोटो)
-
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा विजेता आणि सहाव्यांदा विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ (निर्मल हरिंद्रन : एक्सप्रेस फोटो)

भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य