-
महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये जगातील १० सर्वात मोठ्या निर्यातदारांची यादी असलेले इन्फोग्राफिक शेअर केले आहे.
-
मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्ल्डने तयार केलेल्या या व्हिज्युअलमध्ये चीन, अमेरिका आणि जर्मनी हे तीन अव्वल निर्यातदार देश असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर जपान, यूके, फ्रान्स आणि भारत सारखे देश आहेत.
-
यावेळी महिंद्रा यांनी आकडेवारीसह बॉब डिलनच्या “द टाईम्स दे आर अ-चेंजिन” या प्रतिष्ठित गीताचा उल्लेख केला आहे.
-
महिंद्रा यांनी जागतिक व्यापाराच्या बदलत्या ट्रेंडकडे लक्ष वेधले आणि निर्यात वर्चस्वाचा सध्याचा क्रम फार काळ टिकणार नाही असे संकेत दिले आहेत.
-
पोस्टमध्ये महिंद्रा म्हटले की, “या चार्टवर नीट नजर टाका. कारण क्रम तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त वेगाने बदलणार आहे.”
-
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या आयात शुल्क लादण्याच्या निर्णयांमुळे जागतिक मंदीची भीती पुन्हा निर्माण झाली आहे, अशा वेळी महिंद्रा यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
-
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या आठवड्यात अनेक देशांवरील उच्च आयात शुल्क स्थगित केले असताना, त्यांनी गेल्या आठवड्यात लागू केलेले १० टक्के सार्वत्रिक आयात शुल्क कायम ठेवले आहे.
-
दरम्यान ट्रम्प यांनी चीनविरोधात कठोर पाऊले उचलली आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या वस्तूंवर त्यांनी १४५ टक्के कर लावला आहे.
-
या प्रत्युत्तर म्हणून चीनने शुक्रवारी अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के कर लावला.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल