-
उत्कंठावर्धक झालेल्या सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा पराभव करीत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
-
या वर्षातील फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील विजेतेपद वगळता जोकोविच अन्य तीनही ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
-
अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात जोकोविचने फेडररचा ६-४, ५-७, ६-४, ६-४ असा पराभव केला.
-
फेडररला सूर गवसण्यास थोडा जास्तच वेळ लागला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेरीस जोकोविचने बाजी मारली.
-
फेडररने स्टॅन वावरिंकाचा पराभव करीत अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
-
माजी फूटबॉलपटू डेव्हिड बेकहम आणि अभिनेता ह्यू जॅकमन देखील उपस्थित होता.
-
उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात तणाव किती होता. हे फेडररच्या पत्नीच्या चेहऱयावरूनच लक्षात येईल.
-
या पराभवामुळे फेडररचे पुन्हा एकदा विजेदेपदाचे स्वप्न भंगले.
-
अमेरिकेन ओपन टेनिस स्पर्धेतील जोकोविचचे हे दुसरे ग्रॅंडस्लॅम आहे.
-
पावसामुळे रविवारी सुमारे तीन तास खेळ उशीराने सुरू झाला.
-
जोकोविचने आतापर्यंत दहा ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवली आहेत.
-
अमेरिकेचा हिप-हॉप गायक अलोय ब्लाकनेही सामन्याचा आनंद लुटला. (पीटीआय)

पुण्यात ३ दिवस किडनॅप केलं, मरेपर्यंत मारायला सांगितलं…; मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…