भारत आणि दक्षिण आफ्रिका पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली होती. मात्र, राजकोट येथे रविवारी झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेने भारतीय संघाचा पराभव करून २-१ अशी आघाडी घेतली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे डेव्हिड मिलरला ओपनिंग करण्याची संधी मिळाली. -
दक्षिण आफ्रिकेचा पहिला बळी हरभजन सिंगने घेतला. त्याने डेव्हिड मिलरला केवळ ३३ धावांवर तंबूत पाठवले.
अमित मिश्राने हाशिम आमलाला केवळ पाच धावांवर रोखले. त्यानंतर सामन्याची सूत्रे फॅफ डू प्लेसिसने आपल्या हातात घेतली आणि भारतीय गोलंदाजांचा सामना केला. दरम्यान, क्विंटन डीकॉकने १०३ धावांची महत्वपूर्ण शतकी खेळी करत आफ्रिकेला सन्मान जनक धावसंख्येवर पोहचविले. संघाचा कर्णधार ए बी डी’व्हिलियर्स आणि जीन-पॉल डय़ुमिनी केवळ अनुक्रमे ४ व १४ धावांवर बाद झाले. फरहान बेहरादिनच्या ३६ चेंडूत ३३ धावांच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेने २७० धावांवर मजल मारली. द.आफ्रिकेने दिलेले २७१ धावांचे आव्हान पेलताना भारताने चांगली सुरुवात केली. शिखर धवन लवकर बाद झाल्यावर रोहित शर्माने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि फलंदाजी सुरु ठेवली. -
विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनी ७२ धावांची भागीदारी उभारली.
-
विराट कोहलीने तब्बल ८ महिन्यांनंतर अर्धशतक साजरे केले.
-
पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा रोहित शर्मा यावेळी ६५ धावांवर बाद झाला
-
रोहित शर्मा बाद झाल्यावर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने विराटच्या मदतीने फटकेबाजी सुरु ठेवली.
-
४१व्या षटकात धोनी माघारी परतला आणि मग विजयाचा मार्ग अधिक बिकट झाला. त्यानंतर ४८ चेंडूंत भारताला ७८ धावांची आवश्यकता होती.
-
४८ चेंडूंत भारताला ७८ धावांची आवश्यकता होती. कोहलीने काही चौकार मारून धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, इम्रान ताहीरने सुरेश रैनाला भोपळाही फोडू न दिल्यामुळे ४४व्या षटकात भारताची ४ बाद २०६ अशी अवस्था झाली. आणि शेवटी सामना भारताच्या हातून निसटला.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी