-
वीरेंद्र सेहवागने १९९९ साली भारताच्या एकदिवसीय संघात आणि २००१ साली कसोटी संघात पदार्पण केले होते.
-
वीरेंद्र सेहवागने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले तसेच त्याला अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. सेहवागचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला आहे.
-
सेहवागने १०४ कसोटी, २५१ एकदिवसीय आणि १९ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
सेहवागने २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात २१९ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी साकारली होती.
-
कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे त्रिशतक झळकावणारा एकमेव फलंदाज अशी सेहवागची ओळख आहे.
-
सेहवागने १७ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
-
भारताच्या सलामी फलंदाजीला नवा आयाम मिळवून देणाऱया वीरेंद्र सेहवागने आज आपल्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली.
-
एकदिवसीय, कसोटी आणि ट्वेन्टी-२० या सर्व प्रकारांतून सेहवागने निवृत्ती जाहीर केली आहे.
-
विस्फोटक फलंदाजीच्या बळावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंध्या उडवण्याचा सामर्थ्य सेहवागच्या फलंदाजीत होते.
-
सेहवाग आणि गंभीर या दिल्लीकर जोडीचा भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा राहिला आहे.
-
भारतीय संघात सचिन आणि सेहवागचे नाते नेहमी जवळचे राहले आहे. सचिन हे आपले प्रेरणास्थान राहिल्याचे सेहवागने आजवर वेळोवेळी सांगितले आहे.
-
सेहवागने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत आजवर चाहत्यांनी केलेल्या प्रेमाचे आणि विश्वासाचे सेहवागने ट्विटरवर आभार व्यक्त केले आहेत.
-
केरळ पर्यटनावर बोट सफारी करताना वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी आणि इशांत शर्मा.
-
सेहवागने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कर्णधार धोनीने सेहवागची फलंदाजी पाहण्याचे भाग्य मला लाभले यासाठी मी स्वत:ला नशिबवान समजतो, असे कौतुक केेले.
-
सेहवाग आणि त्याची पत्नी आरती.
-
वीरेंद्र सेहवागचा चिमुकला मुलगा आर्यवीर.
-
विद्यार्थ्यांमध्ये कलागुण जोपसण्याच्या प्रयत्नांतून खेळ आणि कलेला प्राधान्य देणारे 'सेहवाग इंटरनॅशनल स्कूल' सेहवागने सुरू केले आहे.

…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video