भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार आज त्याचा २७वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचनिमित्त गेल्यावर्षापासून ते आजपर्यंतच्या त्याच्या कामगिरीवर एक नजर टाकूया. आज भारत विरुद्ध द.आफ्रिका असा कसोटी सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे ही मालिका भारतात होणार असून, विराट पहिल्यांदाच आपल्या मातृभूमीत संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे त्याच्या छोट्याशा कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा क्षण असेल. (छायाः एक्स्प्रेस फोटो) गेल्यावर्षी आपला २६ वा वाढदिवस साजरा करतेवेळी विराटने धोनीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी शतकी खेळी करुन त्याने आपला वाढदिवस साजरा केला होता. २०१४ साली डिसेंबरमध्ये विराटच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. धोनी त्यावेळी जायबंद असल्यामुळे पहिल्यांदाच कोहलीच्या हाती कर्णधारपदाची सूत्रे देण्यात आली. तेव्हापासून भारतीय संघात आक्रमक नेतृत्वाला सुरुवात झाली. विराटच्या आक्रमक नेतृत्वात भारतीय संघ केवळ विजयासाठीचं खेळत होता. तिस-या कसोटीनंतर धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आणि कसोटीची कमान संपूर्णपणे विराटकडे आली. त्यामुळे, ३ जानेवारी २०१४ ला कर्णधार विराट कोहलीचा जन्म झाला असे म्हणावयास हरकत नाही. पहिल्या कसोटीत विराट हा मिशेल जॉन्सनच्या मारक चेंडूला सामोरा गेला होता. योगायोग म्हणजे त्या कसोटी मालिकेतील तो पहिलाच चेंडू होता. महत्त्वाचे म्हणजे त्या कसोटी मालिकेत विराटने ६९२ धावा केल्या होत्या आणि त्यात ४ शतकांचाही समावेश होता. २०१५ साली झालेल्या विश्वचषकात भारताने उपांत्यफेरी गाठली होती. विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाक रणसंग्रामात भारतीय संघाने त्यावेळी पाकिस्तानला ३०१ धावांचे आव्हान दिले होते. या महामुकाबल्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत शतक साजरे केलेले. शतकासोबत विराट कोहली विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. आयपीएल २०१५ साठी विराटने नंतर रॉयल चॅलेंजर्सच्या संघाचे नेतृत्व केले. या संघाने आयपीएलमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नसली तरी पुन्हा एकदा विराटची नेतृत्वशैली यात दिसून आली. विराटने आधी इंडियन सुपर लीगची फ्रँचाइजी घेतली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय प्रमियर लीगची फ्रँचाइजी घेतली असून तो आता त्याचा सहमालक आहे. महेंद्रसिंग धोनी अजूनही कसोटी क्रिकेटसाठी खेळत असून तो टी-२०चा कर्णधार आहे. धोनीचे हे नेतृत्व पुढे चालविण्यासाठी पहिले नाव नेहमी विराटचेचं राहिल. -
कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराटला पहिले यश मिळाले ते श्रीलंकेत. तब्बल २३ वर्षानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला त्यांच्याच मातीत धुळ चारली. भारताने २-१ने ही मालिका जिंकलेली.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ