-
सनरायझर्स हैदराबाद संघाने आय़पीएलच्या यंदाच्या मोसमाचे विजेतेपद पटकावले. डेव्हिड वॉर्नरच्या संघाने विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव केला. (पीटीआय)
-
आयपीएलच्या विजेतेपदावर पहिल्यांदा नाव कोरल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने जोरदार सेलिब्रेशन केले. (पीटीआय)
-
विजयाचे सेलिब्रेशन करताना हैदराबादचा संघ. (पीटीआय)
-
विजयी सेलिब्रेशन. (पीटीआय)
-
प्रतिस्पर्धी संघात कितीही अव्वल दर्जाचे फलंदाज असो, ते कितीही मर्दुमकी गाजवत असो, कितीही धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची क्षमता असो, पण ज्यांना स्वत:वर आणि संघातील खेळाडूंवर विश्वास असतो ते बोलून न दाखवता करून दाखवतात. नेमके हेच डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरीत करून दाखवले. (पीटीआय)
-
-
आयपीएलच्या नवव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात बंगळुरूवर ८ धावांनी विजय मिळवत हैदराबादने प्रथमच जेतेपदाला गवसणी घातली.
-
डेव्हिड वॉर्नरच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने २०८ धावांचे आव्हान उभे केले होते. (पीटीआय)
-
वॉर्नरनंतर युवराजने फटकेबाजीला सुरुवात करत संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला, त्याने २३ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३८ धावा केल्या (पीटीआय)
-
विराट आणि गेलने संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. परंतु, हे दोघे बाद झाल्यानंतर बंगळुरूचा डाव कोसळला. (पीटीआय)
-
हैदराबादच्या २०९ धावांचा पाठलाग करताना ख्रिस गेलने झंझावाती फलंदाजी करायला सुरुवात केली. गेल एवढा प्रखरपणे प्रहार करत होता की, दुसऱ्या टोकाकडे असलेल्या विराट कोहलीला करण्यासारखे काहीच नव्हते. (पीटीआय)
-
गेल बाद झाल्यावर कोहलीने १३व्या षटकात षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले, पण याच षटकात तोही बाद झाला आणि मोसमात हजार धावा करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. कोहलीने पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. कोहलीनंतर एबी डी’व्हिलियर्सही (५) झटपट बाद झाला व त्यानंतर बंगळुरूच्या हातून सामना निसटला.
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”