या षटकारांचं रहस्य काय? असं हरमनप्रीतला विचारलं असता तिने ही कला आपण लहानपणी मुलांसोबत क्रिकेट खेळताना अवगत केल्याचं म्हणलं.
” लहानपणापासून मला मोठे फटके खेळायला आवडायचे. मुलांसोबत क्रिकेट खेळल्यामुळे मला याची सवय होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मी अशीच खेळी केली. इंग्लंडविरुद्ध मात्र माझा अंदाज थोडा चुकला आणि मी बाद झाले.”
याच आक्रमक खेळापुढे हरमनप्रीतला ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेत खेळायची संधी मिळाली. यानंतर हरमनप्रीतने काऊंटी क्रिकेटमध्येही आपलं नशीब आजमावलं. दोन्ही स्पर्धांमध्ये खेळणारी हरमनप्रीत ही पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.