-
१. सचिन तंवर – गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचा महत्वाचा चढाईपटू, उंची आणि सडपातळ देहयष्टीचा फायदा घेत सचिनने या पर्वात आपला कर्णधार सुकेश हेगडेलाही मागे टाकत संघात आपली जागा पक्की केली आहे.
-
२. अबुझर मेघानी – गुजरातचा उजवा कोपरारक्षक, इराणी खेळाडू हे कबड्डीत भक्कम बचावासाठी ओळखले जातात. अबुझर या पर्वात गुजरातच्या संघाकडून याचाच प्रत्यय देतोय. आपला सहकारी फैजल अत्राचलीसोबत खेळताना अबुझरने या पर्वात अनेक महत्वाच्या खेळाडूंना आपल्या जाळ्यात अडकवलंय.
-
३. विकास कंडोला – हरियाणा स्टिलर्स संघाचा महत्वाचा चढाईपटू, सुमार देहयष्टी आणि कमी उंची असूनही विकास या पर्वात आपल्या खेळाने चकीत केलं आहे. बचावफळीच्या खोलात शिरुन आक्रमण करण्याची खास कला विकासकडे आहे. त्यामुळे नवोदीत हरियाणा संघासाठी हा खेळाडू प्रचंड फायदेशीर ठरतो आहे.
-
४. विशाल भारद्वाज – तेलगू टायटन्सचा डावा कोपरारक्षक, यंदाच्या हंगामात अडचणीत सापडलेल्या तेलगू टायटन्सच्या संघात विशाल भारद्वाजचा खेळ आश्वासक राहीलेला आहे. अँकल होल्ड करण्यात या खेळाडूचा हात कोणीही धरु शकत नाही.
-
५. दर्शन कादियान – यू मुम्बाच्या अंतिम संघात घेळण्याची दर्शनला फार कमी वेळा संधी मिळालेली आहे. मात्र ज्यावेळी संधी मिळाली, त्यावेळी दर्शनने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्ध्यांच्या गटातील महत्वाच्या खेळाडूंना बाद करण्याचं कसब या खेळाडूच्या अंगात आहे.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO