-
तब्बल ८ वर्षांनी पाकिस्तानात आंतराष्ट्रीय क्रिकेटचं आगमन झालं आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्याआधी पाहुण्या संघाचं लाहोरच्या गदाफी स्टेडीयममध्ये खास स्वागत करण्यात आलं.
-
ओपन रिक्षामध्ये बसत World XI संघाच्या खेळाडूंनी मैदानात फेरफटका मारला.
-
हा सामना पहायला पाकिस्तानमधील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. या तिन्ही सामन्यांसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तब्बल १० हजार पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत.
-
पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावा केल्या. बाबर आझमने ८६ धावा केल्या, तर World XI संघाकडून थिसारा परेराराने सर्वाधिक २ बळी घेतले.
-
प्रत्युत्तरादाखल World XI संघ १७७ धावा करु शकला. पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने २० धावांनी विजय मिळवला.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख