-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात भारतीय हॉकी संघानेही आपला सहभाग नोंदवला. बंगळुरु येथील आपल्या सराव केंद्रानजीकचा परिसर महिला आणि पुरुष हॉकी संघाच्या सदस्यांनी स्वच्छ केला.
-
भारतीय हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक जोर्द मरीन यांनीही या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.
-
भारतीय संघाचा सिनीअर गोलकिपर पी.आर.श्रीजेशने स्वतः फावडं हातात धरुन तलावाशेजारी वाढलेलं गवत आणि कचरा साफ केला.
-
या अभियानात भारतीय महिला संघाच्या खेळाडूही मागे नव्हत्या. परिसराची स्वच्छता करण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली.
-
महिला संघाचे नवीन प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांच्यासोबत परिसराची सफाई करताना महिला संघाच्या खेळाडू.
-
२ ऑक्टोबरला गांधी जयंती निमीत्त पंतप्रधान मोदी यांनी तमाम देशवासियांना आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ करुन या अभियानात सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं. गांधीजी हे स्वच्छतेसाठी नेहमी आग्रही होते. पंतप्रधानांच्या या आव्हानाला हॉकी संघाने चांगला प्रतिसाद दिला. साफसफाई झाल्यानंतर संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आपल्या सहकाऱ्यांसोबत.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…