-
ऑस्ट्रेलियावर यशस्वी मात केल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारपासून म्हणजेच २२ ऑक्टोबरपासून वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल झाला, या संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आलंय.
-
जसप्रीत बुमराहने केल्या काही सामन्यांमधून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. मधल्या फळीतला महत्वाचा आक्रमक फलंदाज ते प्रतिस्पर्धी संघाची जमलेली जोडी फोडणारा उपयुक्त गोलंदाज म्हणून पांड्याने आपलं संघातलं स्थान पक्क केलं आहे.
-
मधल्या फळीत मनिष पांडे हा भारताचा आणखी एक महत्वाचा फलंदाज. मात्र केदार जाधव आणि लोकेश राहुल यांच्याशी सुरु असलेल्या स्पर्धेमुळे त्याचं संघातलं स्थान अजुनही पक्कं झालेलं नाहीये. मात्र ज्यावेळी मनिषला संघात संधी मिळाली त्यावेळी त्याने संधीचं सोनं करुन दाखवलेलं आहे.
-
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दिनेश कार्तिकला संघात जागा देण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनी संघात असल्यामुळे त्याला अंतिम ११ जणांमध्ये जागा मिळेल याची खात्री देता येत नाही; मात्र मधल्या फळीतला एक चांगला फलंदाज म्हणून दिनेश कार्तिकचा वापर होऊ शकतो.
-
भारतीय गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र म्हणून जसप्रीत बुमराहनै गेल्या काही सामन्यांमध्ये नावलौकिक मिळवला आहे. अंतिम षटकांमध्ये यॉर्कर गोलंदाजी हे बुमराहचं खास वैशिष्ट्य. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहच्या कामगिरीवर भारतीय संघाचा विजय अवलंबून असणार आहे.
-
हॉटेलमध्ये पोहचल्यावर अक्षर पटेलने लगेचच काही फलंदाजीच्या फटक्यांचा सराव करण्यासाठी बॅट हातात घेतली. कुलदीप आणि युझवेंद्रसोबत अक्षर भारतीय संघात एक महत्वाचा फिरकी गोलंदाज म्हणून काम पाहतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याची कामगिरीही महत्वाची ठरणार आहे.
-
मोहम्मद शमी आणि उमेश यादवच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर भारतीय गोलंदाजीची धुरा असणार आहे. न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीला धक्के देण्याचं काम भुवनेश्वरला आपल्या गोलंदाजीतून करावं लागणार आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ