-
तब्बल दहा वर्षांच्या दशकानंतर आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं मायदेशी आगमन झालं. यावेळी विमानतळावर संघाने आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केला. (फोटो सौजन्य – हॉकी इंडिया फेसबूक पेज)
-
तरुण कर्णधार मनप्रीत सिंह आणि नवनिर्वाचित प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या चेहऱ्यावर आपल्या पहिल्या विजयाचा आनंद दिसत होता.
-
एस. के. उथप्पा आणि युवा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंह. दोघांचाही भारताच्या अजिंक्यपदात मोठा वाटा आहे.
-
बांगलादेशातील ढाका शहरात झालेल्या या स्पर्धेत भारत अजिंक्य राहिला. भारताच्या युवा फळीने सर्व तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देत अजिंक्य राहण्याचा मान पटकावला.
-
एस. व्ही. सुनील आणि चिंगलीन साना हरमनप्रीत सोबत विजयाचा आनंद व्यक्त करताना. एस. व्ही. सुनीलने एक सिनीअर खेळाडू म्हणून दाखवलेली समज ही वाखणण्याजोगी होती.
-
विमानतळाबाहेर मीडियाला फोटोसोठी पोझ देताना भारतीय संघ.
-
या स्पर्धेनंतर भारताला घरच्या मैदानावर दोन महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत.
-
आशिया चषक उंचावत संघाने घरच्या प्रेक्षकांसमोर आपला आनंद व्यक्त केला.
-
कर्णधार मनप्रीत सिंहनेही हा अनमोल क्षण आपल्या सहकाऱ्यांसोबत सेल्फी कॅमेऱ्यात कैद केला.
-
अनुभवी खेळाडू सरदार सिंहनेही आपल्या युवा कर्णधाराचं तोंडभरुन कौतुक केलं.
-
या कौतुकानंतर मनप्रीतने सरदार सोबत सेल्फी काढत हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ