-
पहिल्या सामन्यात विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. न्यूझीलंडकडून पहिल्या वन-डेत हार पत्करावी लागल्यानंतर पुण्याच्या सामन्यासाठी भारतीय फलंदाजांनी नेट्समध्ये कसुन सराव केला.
-
भारताच्या फलंदाजीची मदार ही रोहित शर्मावर राहणार आहे. त्यामुळे रोहित सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
-
क्षेत्ररक्षणाचा सराव करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. या मालिकेत भारताला आपलं आव्हान कायम राखायचं असल्यास पांड्या आणि इतर खेळाडूंनी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे.
-
मार्टीन गप्टीलने आपल्या संघाला फलंदाजीत चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यामुळे भारताला त्यांच्याच मैदानात हरवायचं असल्यास न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी करणं अत्यंत गरजेचं आहे.
-
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला फलंदाजीत आपली छाप पाडता आली नव्हती. मात्र पहिल्या सामन्यात केनने आपल्या गोलंदाजांचा सुरेख वापर करत भारतीय फलंदाजांवर अंकुश लावण्याचं काम केलं.
-
रॉस टेलर आणि टीम साऊदी हे दोन्ही खेळाडू भारतीयांना धक्का देऊ शकतात. पहिल्या सामन्यात रॉसचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं होतं तर टीम साऊदीने ३ बळी घेत ट्रेंट बोल्टला चांगली साथ दिली होती. त्यामुळे या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर न्यूझीलंडचा जय-पराजय अवलंबून असेल.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ