-
तिसऱ्या वन-डे सामन्यासाठी भारताचा संघ कानपूरमध्ये दाखल झाला आहे. या सामन्याआधी भारतीय संघाने व्यायामशाळेत थोडी कसरत केली. हार्दिक पांड्यानेही आपल्या तंदुरुस्तीसाठी व्यायामावर भर दिला.
-
चौथ्या जागेसाठी सध्या भारतीय संघात खूप मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखायचं असल्यास फलंदाजीसाठी ताकद यायला हवी ना? मनिष पांडेने व्यायामशाळेत खास कसरत केली.
-
यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतला फलंदाज महेंद्रसिंह धोनीने स्नूकर टेबलवर आपला हात आजमावून पाहिला.
-
फिरकीपटू कुलदीप यादवही गेमिंग झोनमध्ये रमलेला पहायला मिळाला.
-
युझवेंद्र चहलने मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्या तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याचं ठरवलेलं दिसतंय. चहलला या मालिकेत हवीतशी चमक दाखवता आलेली नाहीये.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ