-
१८ वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर जलदगती गोलंदाज आशिष नेहरा आज आपल्या कारकिर्दीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. काही महिन्यांपूर्वीच नेहराने आपल्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं.
-
२००१ साली आशिष नेहराने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं. १४४ वन-डे सामन्यांमध्ये आशिष नेहराने १५७ विकेट घेतल्या आहेत. २००३ साली दक्षिण आफ्रिकेत विश्वचषकादरम्यान इंग्लंडविरुद्ध २३ धावांत ६ बळी ही नेहराची आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
-
वन-डे सामन्यांप्रमाणे नेहराचा कसोटी क्रिकेटमधला कार्यकाळ अत्यंत अल्प ठरला. १९९९ साली श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत नेहराने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर केवळ १७ कसोटी सामन्यांमध्ये नेहराला संधी मिळाली. या सामन्यांमध्ये नेहराने ४४ विकेट घेतल्या.
-
आंतराष्ट्रीय सामन्यांप्रमाणे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये नेहराची कामगिरी भव्य राहिलेली आहे. दिल्ली संघाकडून खेळताना आशिष नेहराने ९० सामन्यांमध्ये ३०३ विकेट घेतल्या आहेत.
-
वन-डे प्रमाणे आशिष नेहराने टी-२० क्रिकेटमध्येही आपली पकड बसवली. भारताकडून आशिष नेहराने २६ टी-२० सामने खेळले असून यात ३४ विकेट मिळवल्या आहेत.
-
यंदाच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात खेळवल्या गेलेल्या टी-२० मालिकेत आशिष नेहरा भारताकडून शेवटचा खेळला.
-
आयपीएलमध्ये ८८ सामने खेळणाऱ्या आशिष नेहराच्या नावावर १०६ विकेट जमा आहेत.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”