-
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून अगदी कला आणि क्रीडाजगतातही याच उत्साही वाऱ्यांची धूम पाहायला मिळत आहे. कुठे एखादा पट्टीचा गोलंदाजच पत्नीच्या यॉर्करपुढे शरणागती पत्करतोय, तर कुठे दुसरा खेळाडू लग्नसराईच्या वातावरणाचा पुरेपूर आनंद घेताना दिसतोय. क्रिकेटपटू शिखर धवनही याच खेळाडूंच्या यादीतील एक भाग आहे. कारण, नुकतेच त्याच्या बहिणीचे लग्न पार पडले असून, तिच्या लग्नात शिखर आणि त्याचे कुटुंब मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याचे दिसले. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
बहिण श्रेष्ठा हिच्या विवाहसोहळ्यात सहभागी होत शिखर आणि त्याची पत्नी आएशा यांनी फार आनंदात पाहुण्यांचे स्वागत केले. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
आपल्या भावाच्या येणाने श्रेष्ठाच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
शिखरच्या मुलांनीही या सोहळ्यात धमाल केल्याचे त्याने पोस्ट केलेले फोटो पाहून लक्षात आले. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
शिखरच्या बहिणीचा लग्नसोहळा नवी दिल्लीतील सेक्रेड हार्ट कॅथेड्रल येथे पार पडला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
त्यावेळी शिखरने सोशल मीडियावर आपल्या बहिणीचे फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ