-
५ जानेवारीपासून सुर होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी २७ डिसेंबर रोजी रात्री भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. या दौऱ्यात विराट कोहलीसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्माही सोबत असणार आहे.
-
पहिल्या कसोटीसामन्याआधी डाव्या पायाला दुखापत झालेला शिखर धवन आपली पत्नी आयेशा मुखर्जीसोबत आफ्रिकेसाठी रवाना झाला आहे.
-
मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या दोन गोलंदाजांवर भारताच्या जलदगती गोलंदाजीची धुरा असणार आहे. यापैकी इशांत शर्माकडे सर्वात जास्त अनुभव असल्यामुळे तो या दौऱ्यात चांगली कामगिरी करेल असा अंदाजही माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.
-
श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेत संघात जागा न मिळालेल्या रविंद्र जाडेजाला आफ्रिका दौऱ्यात कसोटी संघात जागा देण्यात आलेली आहे.
-
जसप्रीत बुमराह आपल्या कारकिर्दीतला पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेत खेळणार आहे. वन-डे संघात भारताचं ब्रम्हास्त्र मानला जाणारा बुमराह कसोटी संघात जागा मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
-
बुधवारी आपल्या भाऊ कृणाल पांड्याचा लग्नसोहळा आटोपून हार्दिक पांड्या संघासोबत दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाला आहे.
-
विदर्भाच्या उमेश यादवकडूनही यंदा भारतीय संघाला अनेक अपेक्षा असणार आहेत.
-
भारतीय संघासोबत U-19 विश्वचषकासाठीही भारतीय संघ काल न्यूझीलंडला रवाना झाला. यावेळी विमानतळावर U-19 संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड.
-
U-19 विश्वचषकसाठी भारतीय संघाचं नेतृत्व हे मुंबईकर पृथ्वी शॉकडे सोपवण्यात आलेलं आहे. यंदाच्या रणजी हंगामात मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या या अनुभवाचा विश्वचषक स्पर्धेत काही फायदा होतो का हे पहावं लागणार आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख