-
रविवारच्या सकाळी मॅरेथॉनमध्ये नागरिकांनी धावायला सुरुवात केली आणि शालेय मुलींनी या सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बँडच्या पथकात वादन करुन अतिशय उत्तम सलामी दिली. (छायाचित्र – प्रदिप पवार)
-
आपण दिव्यांग असलो तरीही कुठेच कमी नाही, असाच संदेश या महिलेला द्यायचा असावा. देशाचा झेंडा घेऊन मॅरेथ़नमध्ये मोठ्या उत्साहाने ती सहभागी झाली होती. (छायाचित्र – प्रदिप पवार)
-
तरुणांबरोबरच या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठांनीही अतिशय उत्साहात सहभाग घेतला होता. वयाची पर्वा न करता तरुणांना लाजवेल इतक्या ताकदीने ज्येष्ठ मंजळी धावत होती. (छायाचित्र – प्रदिप पवार)
-
उत्तम आरोग्यासाठी धावणे आवश्यक आहे हा एकच संदेश न देता इतरही अनेक उपयुक्त संदेश या मॅरेथॉनच्या निमित्ताने देण्यात आले. देशाची लोकसंख्या वाढत असताना अनेक अडचणी वाढत असल्याने काहीनी लोकसंख्या नियंत्रणाचा संदेशही या मॅरेथॉनमध्ये दिला. (छायाचित्र – प्रदिप पवार)
-
मुंबई मॅरेथॉनमध्ये केवळ मुंबईतील किंवा देशातील स्पर्धक सहभागी होतात असे नाही. तर परदेशातील नागरिकांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. चीनच्या नागरिकांचा मॅरेथॉनमधील सहभाग दर्शविताना एक चीनी नागरिक. (छायाचित्र – प्रदिप पवार)
-
येणाऱ्या पिढीनेही तंदुरुस्त असावे यासाठी आपल्या चिमुकल्याला जणू एक बाबा बाळकडूच तर देत नव्हता ना? मॅरोथॉनमध्ये बाळाला कडेवर घेत या तरुणाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे मॅरेथॉनचा संपूर्ण मार्ग त्याने आपल्या बाळाला कड़ेवर घेऊन पूर्ण केला. (छायाचित्र – प्रदिप पवार)
-
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. अशा परिस्थितीत झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देण्यासाठी या तरुणीने अतिशय अनोखी अशी वेशभूषा करुन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. आपल्या वेशातून तिने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे काम केले. (छायाचित्र – प्रदिप पवार)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ