-
निदहास चषक टी-२० स्पर्धेच्या शेवटच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी पाच धावांची गरज दिनेश कार्तिकने शेवटचा चेंडू कव्हरवरून सिमेपल्याड धाडत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि मैदानात एकच जल्लोष झाला. विशेष म्हणजे भारतीय चाहत्यांबरोबरच श्रीलंकन चाहत्यांनीही या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन केले.
-
भारताच्या या विजयानंतर भारतीय संघाचा चाहता सुधीर याने तिरंगा घेऊन मैदानात धाव घेतली तेव्हा लंकन क्रिकेट चाहत्याने त्याला उचलून घेतले.
-
श्रीलंकन क्रिकेट चाहत्याने भारतीय झेंडा फडकवणाऱ्या सुधीरला उचलून घेतल्याचे फोटो ट्विटवर आणि इतर समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. अनेकांनी हा क्रिकेट या खेळाचा विजय असल्याचे मत व्यक्त केले.
-
श्रीलंकन चाहत्यांचा भारतीय संघाला या संपूर्ण सामन्यात पाठिंबा होता. म्हणूनच सामना आणि चषक जिंकल्यानंतर व्हिक्ट्री लॅप मारताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेचा राष्ट्रध्वज हातात घेतला होता.
-
निदहास चषक टी-२० स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये मैदानावर झालेल्या राडयाच्या पार्श्वभूमीवर अनेक लंकन चाहत्यांनी भारताला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसले. म्हणूनच रोहितने अशाप्रकारे लंकेचा झेंडा हाती घेऊन लंकन चाहत्यांचे आभार मानले.
-
सामना जिंकल्यानंतर अनेक लंकन चाहत्यांनी नागिन डान्स करुन भारताचा विजय साजरा केला. तर भारतीय खेळाडूंनीही अगदी सामन्यानंतरच्या भाषणांमध्ये आणि व्हिक्ट्री लॅपमध्ये चाहत्यांना धन्यवाद म्हटले
-
कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक महत्वाची स्पर्धा जिंकली हे विशेष.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ