-
ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दर दिवसाआड भारतीय खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळत आहे.
-
राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी खेळाडूंकडून पुन्हा एकदा पदकांची अपेक्षा ठेवल्या जात असतानाच या खेळाडूंनीही क्रीडारसिकांची निराशा केली नाही.
-
आठव्या दिवशी कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या राहुल बाळासाहेब आवारेने यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये कुस्तीच्या खेळांमध्ये भारताच्या खात्यात पहिल्या सुवर्णपदकाची भर टाकली आहे.
-
अतिशय अटीतटीच्या या सामन्यात राहुलने कॅनडाच्या खेळाडूला हरवत विजेतेपद पटकावलं. सामना जिंकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.
-
पदक स्वीकारतेवेळीसुद्धा राहुल भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
-
त्याने केलेली ही कामगिरी पाहता फक्त संपूर्ण देशालाच नव्हे, तर महाराष्ट्रालाही या रांगड्या राहुलचा गर्व वाटतोय, असंच म्हणावं लागेल.
-
(छाया सौजन्य- Maj Surendra Poonia)
-
(छाया सौजन्य- ट्विटर)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ