-
सुपरकूल महेंद्रसिंग धोनीची टीम सध्या आयपीएल जिंकल्यामुळे भलतीच चर्चेत आहे. त्याबरोबरच धोनी आपली लाडली झिवा हीच्यामुळेही बराच चर्चेत आहे.
-
आयपीएलमध्ये नुकतीच चेन्नई सुपरकिंग्जची टीम जिंकल्यानंतरही मैदानात धोनी आणि झिवाचा अनोखा अंदाज पहायला मिळाला.
-
धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा हीच्यासोबत विजयाची ट्रॉफी घेतलेला धोनीचा फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ठरला
-
विजयाचा आनंद साजरा करत असतानाच मैदानात धावत आलेल्या आपल्या चिमुकलीला उचलून धरत सुपरकूल कॅप्टनने आनंद साजरा केला.
-
चेन्नईची टीम आणि इतर लोक आयपीएल जिंकल्याचा आनंद साजरा करत असताना धोनी मात्र झिवामध्ये बिझी होता. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुलगी असताना ट्रॉफीची गरज कोणाला आहे अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.
-
चिमुकल्या झिवाच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि धोनीमधील वडिल यांचे भाव नेमके टिपले गेले आहेत.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ