शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला एका धावेने पराभूत करत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या विजयी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ( छायाचित्र सौजन्य : प्रदीप दास ) मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी यांचं घर अँटिलिया येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक ट्रायडंट हॉटेलपर्यंत काढण्यात आली. ( छायाचित्र सौजन्य : प्रदीप दास ) ओपन बसमधून मुंबई इंडियन्सची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. ( छायाचित्र सौजन्य : प्रदीप दास ) विशेष म्हणजे यावेळी पुणेरी ढोलाच्या तालात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ( छायाचित्र सौजन्य : प्रदीप दास ) मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. ( छायाचित्र सौजन्य : प्रदीप दास )
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ