-
२-० ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसावरही वर्चस्व राखले. नाणेफेक जिंकून पहिल्याच दिवशी भारताने द्विशतकी मजल मारली. रोहित शर्माने धमाकेदार शतक ठोकत अनेक विक्रमांना गवसणी घातली.
-
रोहितने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक षटकार (१७*) खेचण्याचा विक्रम केला. त्याने बेन स्टोक्सचा १३ षटकांचा विक्रम मोडला.
-
रोहितने कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत माजी फलंदाज गौतम गंभीर आणि माजी कर्णधार अझरुद्दीन याच्याशी बरोबरी केली.
-
रोहित शर्मा एका कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा जास्त शतकी खेळी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. या आधी माजी फलंदाज सुनिल गावसकर यांनी अशी कामगिरी केली होती.
-
एका वर्षाच्या कालावधीत ९ शतके ठोकणारा रोहित चौथा सलामीवीर ठरला. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
-
एका मालिकेत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम रोहितने रचला. त्याने १७ षटकार खेचले. या आधी विंडिजच्या शिमरॉन हेटमायरने कसोटी मालिकेत १५ षटकार लगावले होते. तो विक्रम रोहितने मोडला.
-
कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांच्या सहाय्याने आपले शतक पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने गौतम गंभीरशी बरोबरी केली. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ