-
बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला.
-
मोहम्मद शमीचे चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या बळावर भारताला दणदणीत विजय मिळवणे शक्य झाले.
-
मयांक अग्रवाल याने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली.
-
या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव मात्र अवघ्या २१३ धावांवर आटोपला.
-
द्विशतक ठोकणाऱ्या मयांक अग्रवालला सामनावीर जाहीर करण्यात आले.
-
भारतीय संघाचा हा सलग सहावा कसोटी विजय ठरला.
-
याचसोबत भारताने सलग वेळा विंडीजमध्ये झालेले २ सामने भारताने जिंकले.
-
त्या पाठोपाठ दक्षिण अफ्रिकेविरूद्ध भारताने ३ सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली.
-
त्यासोबत भारतीय संघाने आज बांगलादेशला पहिल्या कसोटीत पराभूत करत विजेतेपदाचा षटकार लगावला आणि स्वत:च्याच विक्रमाशी बरोबरी केली.
-
या आधी २०१३ मध्ये भारताने सर्वाधिक सलग सहा कसोटी सामने जिंकले होते.
-
सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताने डाव घोषित केल्यानंतर तिसऱ्या दिवशी बांगलादेशच्या संघाचा दुसरा डाव सुरू झाला.
-
३४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची दुसऱ्या डावातही सुरूवात खराब झाली. उपहारापर्यंतच त्यांनी ६० धावांत बांगलादेशने ४ गडी गमावले. त्यानंतरही बांगलादेशला सावरता आले नाही.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ