-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कोलकाता कसोटी सामन्यात बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली.
-
टीम इंडियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना होता. जाणून घेऊयात या ऐतिहासिक कसोटी सामना गाजवणारे भारताचे मानकरी.
-
नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इशांत शर्माने दिवस-रात्र कसोटीत भारताकडून पहिलं षटक टाकलं.
-
इशांत शर्माने आपलं पहिलं षटक निर्धाव टाकत आणखी एक बहुमान आपल्या नावे केला.
-
याचसोबत गुलाबी चेंडूवर पहिली विकेट घेण्याचा मानही इशांतलाच मिळाला. पहिल्या डावात इशांतने बांगलादेशच्या इमरुल कायसला पायचीत केलं.
-
या कसोटी सामन्यात पहिला झेल भारताच्या रोहित शर्माने घेतला. पहिल्या डावात रोहितने बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकचा झेल पकडत त्याला माघारी धाडलं.
-
इशांत शर्माने पहिल्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ गारद करत, दिवस-रात्र कसोटीत भारताकडून ५ बळी घेणारा पहिला गोलंदाज होण्याचा मान मिळवला.
-
बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर संपला. मयांक अग्रवालने भारताकडून पहिली धाव काढली.
-
दिवस-रात्र कसोटीत पहिला चौकार लगावण्याचा मानही मयांक अग्रवालनेच पटकावला.
-
सलामीवीर रोहित शर्माने पहिल्या डावात २१ धावांची खेळी केली. ज्यात त्याने १ षटकार लगावला. दिवस-रात्र कसोटीतला हा भारताचा पहिला षटकार ठरला.
-
टीम इंडियाचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' चेतेश्वर पुजाराने दिवस-रात्र कसोटीत पहिल्यांदा अर्धशतक झळकावलं. त्याने ५५ धावांची खेळी केली.
-
भारतीय कर्णधार विराट कोहली दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला आहे.
-
सामन्यात आणि मालिकेत केलेल्या भेदक कामगिरीच्या जोरावर इशांतने दिवस-रात्र कसोटीत पहिला सामनावीर आणि मालिकावीर होण्याचा बहुमानही पटकावला.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ