-
क्रिकेटविश्वात महिला क्रिकेट हे अनेकदा दुर्लक्षित राहतं. पण काही मंहिला क्रिकेटपटू आपल्या धमाकेदार खेळीने आपला ठसा उमटवतात
-
संपूर्ण वर्षात दमदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC कडून बहुमान प्रदान केला जातो.
-
यंदाच्या महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीला मिळाला
-
आपल्या शानदार खेळीच्या जोरावर एलिस पेरीने हा पुरस्कार पटकावला.
-
एलिसला यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणूनही घोषित करण्यात आले.
-
अष्टपैलू एलिस पेरी हिने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये मिळून ९७.८७ च्या सरासरीने एकूण ७८३ धावा केल्या
-
गोलंदाजीतही एलिसने दमदार कामगिरी करत २८ बळी टिपले.
-
एलिसने २२ जुलै २००७ ला न्यूझीलंडविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
-
अथक परिश्रम करून एलिसने महिला क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले
-
ऑस्ट्रेलियाकडून एलिसने आतापर्यंत ११२ एकदिवसीय सामन्यात ३ हजारांहून अधिक धावा आणि १५२ बळी टिपले आहेत.
-
टी २० क्रिकेटमध्येही एलिसने १११ सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले असून त्यात तिने १ हजाराहून अधिक धावा आणि १०६ बळी टिपले.
-
एलिसने कसोटी क्रिकेटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. ऑस्ट्रेलियाकडून तिने ८ कसोटी सामने खेळले आहेत.
-
कसोटी क्रिकेट कारकिर्दीत एलिसने १३ डावात ६२४ धावा केल्या आहेत. त्यात एक दमदार द्विशतकदेखील सामील आहे.
-
कसोटी गोलंदाजीतही तिने ३१ बळी टिपले असून नुकत्याच झालेल्या महिला अॅशेसमध्ये तिने संघाला विजय मिळवून दिला आहे.
-
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”