-
२०१९ साली भारतीय क्रिकेट संघाने धडाकेबाज कामगिरी केली, अखेरच्या वन-डे सामन्यात विंडीजवर मात करत भारतीय संघाने यंदाच्या वर्षाचा शेवट गोड केला.
-
यंदाच्या वर्षात अनेक नवीन खेळाडूंनी भारतीय संघात पदार्पण केलं.
-
हैदराबादच्या मोहम्मद सिराजने जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यात पदार्पण केलं, मात्र या सामन्यात त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही.
-
तामिळनाडूच्या विजय शंकरलाही यंदा वन-डे क्रिकेटमध्ये संधी मिळाली. वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यात विजय शंकरने संघात पदार्पण केलं.
-
पंजाबच्या शुभमन गिललाही वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात संघात संधी मिळाली. मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात तो अपयशी ठरला.
-
मुंबईच्या शिवम दुबेनेही वर्षाअखेरीस वन-डे संघात पदार्पण केलं. चेन्नईविरुद्ध वन-डे सामन्यात त्याला संधी मिळाली. या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. दुबेही या सामन्यात फारसा चमकू शकला नाही.
-
नवदीप सैनी या नवोदीत तरुणानेही वर्षाअखेरीस भारतीय वन-डे संघात पदार्पण केलं. टीम इंडियाच्या वर्षाच्या अखेरच्या सामन्यात सैनीला संधी मिळाली. ज्यात त्याने २ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली.
-
गेले काही हंगाम स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या शाहबाज नदीमला यंदा भारतीय कसोटी संघाचं तिकीट मिळालं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची कसोटीत नदीम भारतीय संघात खेळला.
-
या सामन्यात ४ बळी घेत नदीमने आपली निवड सार्थ ठरवली. मात्र यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलं.
-
आयपीएल गाजवणाऱ्या मयांक मार्कंडेनेही भारतीय संघाचं तिकीट मिळवलं. फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम टी-२० सामन्यात मयांक भारतीय संघाकडून खेळला, मात्र त्याची कामगिरी फारशी दखल घेण्यासारखी नव्हती.
-
विश्वचषकानंतरच्या विंडीज दौऱ्यात नवदीप सैनीने टी-२० मालिकेत भारतीय संघात पदार्पण केलं. आतापर्यंत ५ टी-२० सामने खेळलेल्या नवदीपने ६ बळी घेतले आहेत.
-
याच विंडीज दौऱ्यात राहुल चहरनेही भारतीय संघातून पदार्पण केलं, ज्यात त्याला केवळ १ बळी मिळवता आला.
-
मुंबईकर शिवम दुबेची टी-२० क्रिकेटमधली कामगिरी चांगली झालेली आहे. ६ सामन्यांमध्ये आतापर्यंत शिवमने ३ बळी घेतले असून त्याच्या नावावर ६४ धावा जमा आहेत. बांगलादेशच्या भारत दौऱ्यात दिल्ली टी-२० सामन्यात दुबेने भारतीय संघाकडून पदार्पण केलं.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”