-
२०१९ हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी अतिशय चांगलं गेलं. काही अपवाद वगळता भारताने गेल्या वर्षभरात सर्व महत्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला.
-
भारतीय गोलंदाजांनीही या वर्षात भेदक मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना अक्षरशः आपल्या तालावर नाचवलं.
-
४ भारतीय गोलंदाजांनी २०१९ वर्षात हॅटट्रीकची नोंद केली, जाणून घेऊयात या खेळाडूंबद्दल…
-
भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात जसप्रीत बुमराहने जमैका कसोटी सामन्यात हॅटट्रीकची नोंद केली. अशी कामगिरी कऱणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला.
-
याआधी हरभजन सिंह आणि इरफान पठाण यांनी कसोटीत हॅटट्रीक नोंदवली होती. बुमराहने डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रुक्स आणि रोस्टन चेस या फलंदाजांना माघारी धाडलं.
-
२०१९ विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात अखेरच्या षटकात हॅटट्रीक नोंदवली. शमीने मोहम्मद नबी, अफताब आलम आणि मुजीब उर-रेहमान या फलंदाजांना माघारी धाडलं.
-
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यात कुलदीप यादवने दुसऱ्या वन-डेत हॅटट्रीकची नोंद केली. कुलदीपने शाई होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ यांना माघारी धाडलं.
-
बांगलादेशच्या भारत दौऱ्यात अखेरच्या टी-२० सामन्यात दीपक चहरने हॅटट्रीकची नोंद केली. १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शफिउल इस्लाम आणि २० व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर मुस्तफिजूर रेहमान आणि अल-अमिन हुसेनला माघारी धाडत चहरने हॅटट्रीक केली.

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार