आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला आहे. सचिन, सेहवाग, गांगुली, रोहित, धोनी आणि विराट कोहलीने अनेक विक्रम मोडीत काढले आणि प्रस्थापितही केले. अशेच भातीयांनी केले काही विक्रम आज आपण पाहणार आहोत… -
९० च्या दशकात पाकिस्तान विरोधात अखेरच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळून देणाऱ्या राजेश चौहान यांना सर्वजण ओळखतात. पण त्यांच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम आहे. राजेश चौहान कसोटीमध्ये भारतासाठी लकी चार्म होते. राजेश चौहान यांनी आपल्या करिअरमध्ये २१ कसोटी सामने खेळले आहेत. हे सर्वच सामने भारताने जिंकले आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका डावात दहा बळी मिळवण्याची किमया अनिल कुंबळेनं केली होती. हा विक्रम आजही कुंबळेच्या नावावर आहे. याआधी हा विक्रम Jim Lake या गोलंदाजाच्या नावावर होता. सर्वाधिक वेगवान २०० बळी घेण्याच्या बाबतीत अश्विन सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०० बळी घेताना अश्विनच्या नावावर एक दुर्मिळ विक्रमाची नोंद झाली आहे. अश्विनने ३७ सामन्यात १०, २२९ चेंडूमध्ये दोनशे बळी घेतले आहेत. हा विश्वविक्रम आहे. सर्वाधिक कमी चेंडूमध्ये २०० बळी घेण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. बापू नाडकर्णी यांना सध्याच्या पिडीत फारसं कोणी ओळखतं नसेल. पण त्यांच्या गोलंदाजीवर फलंदाजांना धावा काढताना कसरत करावी लागत होती. त्यांच्या करियरमधील गोलंदाजीची सरासरी १.६७ अशी आहे. बापू नाडकर्णी यांनी १९६४ मध्ये इंग्लंडच्या विरोधात सलग २१ षटकं निर्धाव टाकली होती. आजतागत हा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. -
यानंतर २००५ साली पाकिस्तानविरुद्ध कोलकाता कसोटी सामन्यात द्रविडने पहिल्या डावात ११० तर दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या.
-
विराट कोहलीच्या फलंदाजीचे विक्रम तूम्ही ऐकले असतील पण त्याच्या गोलंदाजीचा एक विक्रम तोडणं कठीण आहे. हा विक्रम मोडण्यासाठी नशीबाचीही साथ लागते. २०११ मध्ये टी-२० सामन्यात गोलंदाजी करताना विराट कोहलीनं वाईड चेंडूवर बळी घेतला. एकही चेंडू न टाकता बळी घेणारा विराट जगातील एकमेव गोलंदाज आहे. माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी आपल्या कसोटी करियरमध्ये ४०० बळी आणि पाच हजार धावा काढल्या आहेत. असा पराक्रम करणारे कपिल देव जगातील एकमेव अष्टपैलू खेळाडू आहेत. स्विंगचा बादशाह इरफान पठाणने २००६ मध्ये कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक नोंदवली होती. कसोटी सामन्यात पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक नोंदवणारा इरफान पहिलाच गोलंदाज आहे. आजतागत इरफानचा हा विक्रम आबाधित आहे. कसोटीमध्ये द्विशत आणि त्रिशतक झळकावणारा विरेंद्र सेहवाग एकमेव खेळाडू आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये हा विक्रम मोडणं थोडं कठिण वाटतेय. मोहिंदर अमरनाथ यांच्यावर एका नकोशा विक्रमाची नोंद झालेली आहे. ‘ हॅन्डलिंग द बॉल अॅण्ड ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’नुसार बाद होणारे एकमेव फलंदाज मोहिंदर अमरनाथ आहेत. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड या नियमानुसार बाद होणारे अनेक फलंदाज आहेत. मात्र,हॅन्डलिंग द बॉल आणि ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड या दोन्ही नियमानुसार बाद होणारे अमरनाथ एकमेव फलंदाज आहेत. २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूवर षटकार मारून धोनीने भारताला जेतेपद मिळवून दिलं होते. धोनीने आतापर्यंत १२ वेळा षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला आहे. २००५ मध्ये धोनीनं पहिल्यांदा षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. अखेरच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून देण्याचा धोनीचा विक्रम मोडणं कठीणच आहे. -
कर्णधार म्हणून एम.एस धोनीनं अनेक विक्रम केले आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीनं ३३१ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग असून त्यानं ३२४ सामन्यात कर्णधारपद भूषावलं आहे.
माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक धोनीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सध्या यष्टीरक्षणात धोनीसारखं कोणीचं नाही, असे म्हटले जातेय. तिन्ही प्रकाच्या सामन्यामध्ये सर्वाधिक यष्टीचीत करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने १९५ यष्टीचीत केले आहेत. दुसऱ्या क्रमांकार श्रीलंकेचा कुमार संगकाराचा क्रमांक लागतो. संगकाराने आपल्या करिअरमध्ये १३९ यष्टीचीत केले आहेत. भारताची रणमशीन म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीच्या नावावरही विक्रम आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० धावांची सर्वाधिकवेळा भागिदारी करण्यात विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यात दहा वेळा २०० धावांच्या भागिदारीमध्ये सहभाग नोंदवला आहे. कसोटी सामन्यात स्लीपमध्ये सर्वात आधी २०० झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. स्लीपमध्ये राहुल द्रविडने २०१० झेल घेण्याचा विक्रम केला आहे. आजही हा विक्रम आबाधित आहे. राहुलशिवया महेला जयवर्धने याने २०५ आणि जॅक कॅलिसने २०७ झेल घेतले आहेत. मात्र, राहुल द्रविडचा विक्रम त्यांना मोडता आला नाही. -
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. मॉर्डन क्रिकेटमध्ये हा विक्रम मोडणं कठीण आहे. रोहित शर्माचा एकदिवसीय सामन्यातील वैयक्तीक सर्वोच्च धावाचा (२६४ नाबाद) विक्रम मोडणंही तेवढचं कठीण आहे.
राजीव नायर यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सलग तीन दिवस फलंदाजी केली आहे. राजीव नायर यांनी १०१५ मिनिटं फलंदाजी केली. कोणत्याही फंलदाजानं आतापर्यंत १००० मिनिटं मैदानावर फलंदाजी केली नाही, आणि यापुढंही करेल असं दिसत नाही. पदार्पणाच्या कसोटीत वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. २०१३ मध्ये शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ चेंडूत शतक झळकावलं. भारताचे दिग्गज फलंदाज विजय हजारे यांच्या नावावर एक मोठा विक्रम आहे. १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना विजय हजारे यांनी सलग दोन दिवसांत दोन शतकं झळकावली होती. कसोटी क्रिकेटमध्ये आतजागत हे कोणालाही शक्य झालं नाही ७२ वर्षानंतरही हा विक्रम आबाधित आहे. विजय हजारे यांनी ११६ आणि १४५ धावांची शतकी खेळी केली होती. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीला खेळताना आठ हजारांपेक्षा आधिक धावा करण्याचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. -
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये १०० शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. त्याशिवया ३४ हजारांपेक्षाही जास्त धावा सचिनच्या नावावर आहेत. हा विक्रम आजतागत अबाधित आहे. विराट कोहली किंवा रोहित शर्मा हा विक्रम मोडेल असं खुद: सचिनने एका मुलाखतीत सांगितले आहे.
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य