-
टीम इंडियाने 2020 या वर्षाची सुरुवात मालिका विजयाने केली
-
श्रीलंकेविरुद्धची टी 20 मालिका भारताने 2-0 ने जिंकली.
-
पहिल्या सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
-
दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय मिळवला.
-
तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला 78 धावांनी धूळ चारली
-
या सामन्यात भारताचे पाच महत्वाचे खेळाडू विजयाचे शिल्पकार ठरले.
-
शार्दूल ठाकूर – अष्टपैलू कामगिरी करणारा शार्दूल ठाकूर याला सामनावीर ठरवण्यात आले. त्याने 8 चेंडूत 22 धावा केल्या आणि 2 बळी टिपले.
-
लोकेश राहुल – राहुलने धडाकेबाज खेळी करत 36 चेंडूत 54 धावा केल्या.
-
शिखर धवन – टीम इंडियाच्या गब्बरने 36चेंडूत दमदार अर्धशतकी खेळी केली. तो 52 धावांवर बाद झाला.
-
मनीष पांडे – मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे याने उपयुक्त अशी छोटेखानी खेळी केली. त्याने 18 चेंडूत नाबाद 31 धावा ठोकल्या.
-
नवदीप सैनी – भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने दमदार कामगिरी करत 3 बळी टिपले. त्याला मालिकाविराचा 'किताब मिळाला.
-
भारताची पुढील मालिका ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. 14 जानेवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वन-डे मालिका सुरू होणार आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार