-
'द वॉल' म्हणून नाव कमावलेल्या राहुल द्रविडचा आज वाढदिवस…. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया 'कसा घडला राहुल द्रविड?'
-
१९७३ – भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा जन्म ११ जानेवारी १९७३ ला इंदोर येथे झाला होता. त्यानंतर काही वर्षातच तो टीम इंडियाच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बनला.
-
१९९६ – राहुल द्रविडने क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स च्या मैदानावरून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ९५ धावांची खेळी केली.
-
आपल्या संयमी आणि बहारदार खेळीने द्रविड कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने १६४ कसोटींमध्ये १३ हजार २८८ धावा केल्या.
-
द्रविडने ३४४ एकदिवसीय सामने खेळले. त्यात त्याने १० हजार ८९९ धावा केल्या. इंग्लंडमध्ये झालेल्या १९९९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
-
२००० – Wisden ने निवडलेल्या सर्वोत्तम ५ क्रिकेटपटूंमध्ये द्रविडचा समावेश करण्यात आला होता.
-
२००६ – या वर्षी झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर राहुल द्रविड च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला. तब्बल ३५ वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदा भारतीय संघाने विंडीजच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकली.
-
३) राहुल द्रविड – द वॉल या नावाने ओळखला जाणाऱ्या द्रविडने आपल्या कारकिर्दीत दोनवेळा कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावण्याची किमया केली आहे. १९९९ साली न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन कसोटी सामन्यात द्रविडने पहिल्या डावात १९० तर दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या होत्या. हा सामना भारतीय संघाने अनिर्णित राखला……
-
२०१२ – ९ मार्च २०१२ ला राहुल द्रविडने आपल्या १६ वर्षाच्या समृद्ध कारकिर्दीला 'ब्रेक' लावला आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
-
२०१३ – 'द वॉल' राहुल द्रविडला २०१३ साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
२०१८ – ICC च्या मानाच्या Hall of Fame मध्ये राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला. त्यांच्याबरोबरच ऑस्ट्रेलिया चा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यालाही हा बहुमान प्रदान करण्यात आला.
-
'लोकसत्ता'कडून राहुल द्रविडला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ