प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या रविवारी होणारी मुंबई मॅरेथॉनच्या स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरुवात झाली. (सौजन्य: अमित चक्रवर्ती) वरळी येथून हाफ मॅरेथॉनची सुरूवात झाली आहे. यंदा मुंबई मॅरेथॉनचे हे १७वे पर्व आहे. (सौजन्य: अमित चक्रवर्ती) यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (सौजन्य: अमित चक्रवर्ती) या स्पर्धेसाठी एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर बक्षिसाची रक्कम असून या स्पर्धेतील तीन परदेशी धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार डॉलर , २५ हजार डॉलर आणि १७ हजार डॉलर रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर भारतीय स्पर्धकांना ५ लाख ,४ लाख आणि ३ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. (सौजन्य: अमित चक्रवर्ती) मुंबई मॅरेथॉनसाठी देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकांनीही या स्पर्धेत भाग घेतला. (सौजन्य: अमित चक्रवर्ती) मुंबई मॅरेथॉनमध्ये जवळपास ५५,३२२ धावपटू सहभागी झाले. (सौजन्य: अमित चक्रवर्ती) काही धावपटूंनी देशाचा झेंडा हवेमध्ये फडकवत या स्पर्धेत सहभाग घेतला. (सौजन्य : निर्मल हरिंद्रन) ४२.१९५ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ९,६६० धावपटू, २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १५,२६० तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या ‘ड्रीम रन’मध्ये १९,७०७ स्पर्धक, १० किमी शर्यतीत ८,०३२, वरिष्ठांच्या मॅरेथॉनमध्ये १,०२२ आणि अपंगांच्या शर्यतीत १,५९६ धावपटूंचा सहभाग आहे. (सौजन्य : निर्मल हरिंद्रन) टाटा मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धेसाठी मुंबई महापालिकेसह सर्व प्रशासकीय व पोलीस यंत्रणाही सज्ज असून स्पर्धकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी विविध वाहतूक बदल आणि अतिरिक्त रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. काही धावपटूंनी सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देणारी फलके घेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवला( सौजन्य: निर्मल हरिंद्रन)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”