-
भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आज वयाची ३० वर्ष पूर्ण करतो आहे.
-
भन्नाट स्विंग आणि गोलंदाजीतली अनोखी शैली या जोरावर भुवनेश्वरने भारतीय संघातलं आपलं स्थान पक्क केलं.
-
सध्या भुवनेश्वर भारतीय संघात दुखापतीमुळे खेळू शकत नाहीये, तरीही त्याच्या नावावर असे काही विक्रम जमा आहेत जे कोणाताही गोलंदाज अद्याप करु शकलेला नाही.
-
२००८-०९ च्या रणजी हंगामात उत्तर प्रदेश विरुद्ध मुंबई अंतिम सामन्यात भुवनेश्वर कुमारने सचिन तेंडुलकरला शून्यावर माघारी धाडत एकच खळबळ उडवली होती.
-
कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये 5 wicket haul घेण्याचा मानही भुवनेश्वर कुमारच्या नावे जमा आहे.
-
पाकिस्तानविरुद्ध वन-डे सामन्यात पदार्पण करताना भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद हाफिजला माघारी धाडलं होतं.
-
कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमारने आपली पहिली विकेट फलंदाजांचा त्रिफळा उडवून घेतलेली आहे.
-
२०१४ सालचा इंग्लंडविरुद्धची मालिका भुवनेश्वरसाठी खास मानली जाते. भारतीय खेळपट्ट्यांवर भुवनेश्वरने गोलंदाजीत १९ बळी मिळवत २४७ धावाही केल्या होत्या. या कामगिरीसाठी भुवनेश्वरला मालिकावीराचा किताबही देण्यात आला होता.
-
आयपीएलच्या २०१६ आणि २०१७ या दोन्ही हंगामात भुवनेश्वरने 'पर्पल कॅप' (सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांसाठीचा बहुमान) मिळवली होती.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ