-
लोकेश राहुल सध्या चांगल्याच फॉर्मात आहे, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचा डाव सावरताना लोकेश राहुलने शतक झळकावलं.
-
सर्वात आधी श्रेयस अय्यर आणि त्यानंतर मनिष पांडेसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचताना लोकेश राहुलने ११३ चेंडूत ११२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
-
या शतकी खेळीदरम्यान राहुलने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. जाणून घेऊयात…
-
न्यूझीलंडमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा लोकेश राहुल पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.
-
याचसोबत लोकेश राहुल आशिया खंडाबाहेर वन-डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे.
-
आशिया खंडाबाहेर वन-डे क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. युवराज सिंहने ऑस्ट्रेलियाविरोधात १३९ तर झिम्बाब्वेविरोधात १२० धावा केल्या होत्या.
-
यंदाच्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ८० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याची लोकेश राहुलची ही तिसरी वेळ ठरली आहे. गेल्या ३ वर्षांत भारतीय संघाकडून पाचव्या क्रमांकावर कोणत्याही खेळाडूने अशी कामगिरी केली नाहीये.
-
याचसोबत ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिकवेळा ५० धावा करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीत राहुलने धोनीशी बरोबरी केली आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ