-
२०१३-१४ आणि २०१४-१५ अशी सलग दोन वर्ष कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. क्रिकेटपटू विनय कुमारने ही दोन्ही वर्ष कर्नाटकचे नेतृत्व केले. (सर्व फोटो सौजन्य – विनय कुमार इन्स्टाग्राम)
-
विनय कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-ट्वेंटी या तिन्ही प्रकारात विनय कुमार भारताच्या राष्ट्रीय संघातून खेळला आहे.
-
विनय कुमार वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये तो शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे.
-
१२ फेब्रुवारी १९८४ रोजी विनय कुमारचा कर्नाटकमध्ये जन्म झाला. काल त्याचा वाढदिवस होता.
-
सरकारी शाळेमध्ये शिकलेल्या विनय कुमारने ए.आर.जी आर्टस आणि कॉमर्स कॉलेजमधून बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे.
-
विनय कुमारने २९ नोव्हेंबर २०१३ रोजी गर्लफ्रेंड रिचा सिंह बरोबर लग्न केले. दोघांचे बऱ्याचवर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते.
-
विनय कुमार आयपीएलमध्ये वेगवेगळया संघांकडून खेळला आहे.
-
२०११ साली विनय कुमारला केरळच्या कोची टसकर्सने तीन कोटी रुपये मोजून विकत घेतले होते.
-
त्यानंतर विनय कुमार आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सकडूनही खेळला.
-
२०१४ च्या आयपीएलमध्ये विनय कुमार कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला.
-
२०१८ सालच्या आयपीएल लिलावात विनय कुमारला कोलकाता नाईट रायडर्सने १ कोटी रुपयांना विकत घेतले.
-
विनय कुमार मूळचा दावनगिरीचा असल्यामुळे जवळची माणसे त्याला 'द दावनगिरी एक्स्प्रेस' म्हणून बोलावतात.
-
विनय कुमारचा पत्नी रिचा सोबतचा फोटो.
-
बर्थ डे सेलिब्रेशनचा विनय कुमारने पत्नी रिचा सोबतचा शेअर केलेला फोटो. या फोटोला त्याने 'थँक्स वाईफी' असे कॅप्शन दिले आहे.
-
जुलै २०१८ मध्ये पत्नी रिचाच्या बर्थ डे चा विनय कुमारने बीचवरील शेअर केलेला फोटो.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ