-
आयपीएलचा आगामी हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे.
-
२९ मार्चला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे.
-
याआधीच मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख गोलंदाज विवाहबंधनात अडकला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा खेळाडू आहे तरी कोण??
-
न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मिचेल मॅक्लेनघनने नुकतच लग्न केलं आहे.
-
मिचेल आणि त्याची प्रेयसी जॉर्जिया गेला बराच काळ रिलेशनशीपमध्ये होते. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जॉर्जिया ही मुळची इंग्लंडची आहे.
-
मिचेल याआधी रिनी ब्राउन या तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र त्यांचं ब्रेकअप झालं.
-
२०१६ साली मिचेल न्यूझीलंडकडून आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
-
मॅक्लेनघनने मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने न्यूझीलंडचं आतापर्यंत ४८ वन-डे आणि २९ टी-२० सामन्यांत प्रतिनिधीत्व केलं आहे.
-
वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये मिचेलच्या नावावर अनुक्रमे ८२ आणि ३० बळी जमा आहेत.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी