-
५ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या रशियाच्या ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाने नुकतीच निवृत्ती स्विकारली. (सर्व फोटो – फेसबुक, इन्स्टाग्राम / मारिया शारापोव्हा)
-
आपल्या कारकिर्दीत शारापोव्हाने २ वेळा फ्रेंच ओपन आणि प्रत्येकी एकदा ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन व विम्बल्डन स्पर्धांची विजेतेपदं पटकावली.
-
वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी मारिया शारापोव्हा हिने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला.
-
शारापोव्हाच्या या निर्णयाची अनेकांना कल्पना नव्हती. त्यामुळे या निर्णयानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला.
-
मारिया शारापोव्हाने तिच्या कारकिर्दीत विविध विक्रमांना गवसणी घातली. त्याशिवाय ती एक ग्लॅमरस आणि सौंदर्यवती टेनिसस्टार म्हणूनदेखील चर्चेत राहिली. जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…
-
मारिया शारापोव्हाचा जन्म २६ एप्रिल १९८७ साली सर्बिया येथे झाला. शारापोव्हाने रशियात चार वर्षांची असताना टेनिस खेळण्यास सुरूवात केली होती.
-
३ वर्षांनंतर १९९४ मध्ये तिचे कुटुंब अमेरिकेत आले. त्यामुळे अमेरिकेत शारापोव्हाने टेनिसचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले.
-
२००२ साली मारिया शारापोव्हा हिने ऑस्ट्रेलियन ओपन ज्युनिअर स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती सर्वात तरूण टेनिसपटू ठरली होती.
-
शारापोव्हाने २००४ साली १७ वर्षांची असताना विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत आपले पहिले ग्रँडस्लॅम पटकावले. त्या सामन्यात तिने अव्वल मानांकित सेरेना विल्यम्स हिला पराभूत केले होते.
-
२००४ याच वर्षी मारिया शारापोव्हा हिने Women's Tennis Association च्या टॉप १० मध्ये प्रवेश केला.
-
२००६ साली वयाच्या १९ व्या वर्षी मारिया शारापोव्हाने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली. २००८ साली तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली, तर २०१२ साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली.
-
फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने तिने विजेतेपदाचा स्लॅम पूर्ण केला. असा पराक्रम करणारी ती १० वी महिला टेनिसपटू होती.
-
२०१३ साली सलग ९ वर्षे सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या 'फोर्ब्स'च्या यादीत शारापोव्हाला अव्वल स्थान मिळाले होते.
-
मारिया शारापोव्हाचे भारतीयांवर आणि भारतीय भाषांवर विशेष प्रेम होते. त्यामुळेच तिने स्वत:च्या मानेवर हिंदीमध्ये 'जीत' या शब्दाचा टॅटू काढून घेतला होता.
-
शारापोव्हाचे सुमारे दोन वर्ष अलेक्झांडर गिलकेस यांच्याशी अफेअर होते. ४० वर्षीय गिलकेस लंडनमधील उद्योगपती आहेत. तसेच ते 'पॅडल8' चे संस्थापक अध्यक्ष आहेत. पॅडल8 ही ऑनलाईन बोली लावणारी वेबसाईट आहे.
-
२०१६ साली शारापोव्हा उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणी दोषी आढळली. त्यामुळे तिच्यावर २ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. पण नंतर ही बंदी कमी करून १५ महिन्यांवर आणण्यात आली होती.
-
डोपिंग प्रकरणी दोषी आढळल्यामुळे मारिया शारापोव्हाचे सुमारे १६५ कोटी रूपयांचे नुकसान झाले. Nike, Porshe, सॅमसंग, यांसारख्या नामांकित ब्रँडनी तिला दिलेले प्रायोजकत्व काढून घेतले. त्याचा मोठा फटका तिला बसला.
-
२०१७ साली शारापोव्हाने बंदीची शिक्षा संपल्यावर टेनिसमध्ये पुनरागमन केले. पण त्यानंतर तिला कारकिर्दीत फारशी चमक दाखवता आली नाही.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ