-
भारत आणि न्यूझीलंड यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ख्राईस्टचर्च येथे खेळवण्यात आला.
-
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताला ७ गडी राखून पराभवाची धूळ चारली आणि मालिका २-० ने जिंकली.
-
न्यूझीलंड विरूद्धच्या पराभवाबरोबरच भारतीय संघाचा हा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिला मालिका पराभव ठरला.
-
या पराभवाची नैतिक जबाबदारी विराटसेनेने स्वीकारली आहेच. पण पुढील पाच खेळाडूंपैकी तुम्हाला पराभवासाठी जबाबदार नक्की कोण आहे असं वाटतं?
-
मयंक अग्रवाल – मयंकने दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात निराशा केली. त्याने पहिल्या डावात ७ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात केवळ ३ धावा केल्या.
-
ऋषभ पंत – ऋषभने कसोटी संघात पुनरामन केले पण त्याने दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात १२ तर दुसऱ्या डावात अवघ्या ४ धावा केल्या.
-
विराट कोहली – जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कसोटी फलंदाज विराट या सामन्यात पुरता 'फ्लॉप' ठरला. त्याने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात १४ धावा केल्या.
-
अजिंक्य रहाणे – उपकर्णधार अजिंक्य रहाणेदेखील दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला. त्याने पहिल्या डावात ७ धावा तर दुसऱ्या डावात ९ धावा केल्या.
-
उमेश यादव – इशांत शर्माच्या जागी संघात स्थान मिळालेल्या उमेशला दोनही डावात प्रत्येकी १-१ बळीच टिपता आला.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ