-
T20 World Cup मध्ये गुरूवारी भारत – इंग्लंड यांच्यात पहिला उपांत्य सामना होणार आहे. (सर्व फोटो – इन्स़्टाग्राम / इंडियनक्रिकेटटीम आणि शफाली शर्मा)
-
T20 World Cup 2020 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत भारतीय संघ अजिंक्य होता.
-
भारताला उपांत्य फेरी गाठून देण्यात सलामीवीर शफाली वर्माने मोलाचा वाटा उचलला.
-
शफालीने तडाखेबाज खेळी करून भारतीय संघाला दमदार विजय मिळवून दिले.
-
शफालीने साखळी फेरीत अनुक्रमे २९, ३९, ४६ आणि ४७ धावा ठोकल्या आणि वाहवा मिळवली.
-
उपांत्य फेरीसाठी शफाली नेट्समध्ये खास सराव करताना दिसली. तिचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
-
शफालीच्या दमदार खेळीचे खुद्द सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी कौतुक केले.
-
ICC च्या टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत शफालीने स्वत:ला सिद्ध केले.
-
रोहतकच्या शफालीने अवघ्या सहा महिन्यात टी २० क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले.
-
सप्टेंबर २०१९ मध्ये तिने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
-
आतापर्यंत शफालीने १८ टी २० सामन्यात ४८५ धावा केल्या आहेत.
-
शफालीने १४६.९६ च्या स्ट्राईक रेटने खेळताना २ अर्धशतके झळकावली आहेत.
-
जगात 'नंबर १' ठरणारी शफाली भारतीय टी २० क्रिकेटमधील सर्वात तरूण क्रिकेटपटू ठरली.
-
मिताली राजनंतर टी २० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी शफाली एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली.
-
आता उपांत्य फेरीत शफाली कशी कामगिरी करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली