-
संग्रहित छायाचित्र
-
-
IPL 2020 चे आयोजन आधी २९ मार्चपासून करण्यात आले होते. मुंबईच्या वानखेडे मैदानावर धोनीची चेन्नई विरूद्ध रोहितची मुंबई अशी लढत रंगणार होती.
-
मात्र, करोनाच्या भीतीने अनेक परदेशी खेळाडूंनी माघार घेण्याचे संकेत दिले. त्यामुळे IPL 2020 च्या हंगामाला स्थगिती देणे BCCI ला भाग पडले. अजूनही करोनाचा जगभरातील प्रभाव अपेक्षेइतका कमी झालेला नाही.
-
अशा परिस्थितीत IPL चा यंदाचा हंगाम रद्द करण्याची नामुष्कीदेखील BCCI वर येऊ शकते. जर IPL 2020 स्पर्धा रद्द झाली, तर अनेक बड्या खेळाडूंना कोट्यवधींचा फटका बसू शकतो. पाहूया सर्वाधिक फटका बसू शकणारे १० खेळाडू…
-
IPL 2020 रद्द झाल्यास त्याचा सर्वाधिक १० जणांपैकी सर्वात कमी फटका शिमरॉन हेटमायरला बसेल. त्याला ७.७५ कोटींच्या बोलीवर दिल्ली संघाने विकत घेतले आहे. त्यामुळे सत्र न झाल्यास त्या ते पैसे मिळणार नाहीत.
-
या यादीत शेवटून दुसरे नाव असेल ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कुल्टर-नाईलचे. मुंबईच्या संघाने त्याला ८ कोटींना विकत घेतले आहे, पण सत्र न झाल्यास त्याला संपूर्ण रकमेला मुकावे लागेल.
-
कुल्टरनाईटपेक्षा थोडं जास्त नुकसान होईल ते शेल्डन कॉट्रेलचं. विंडीजच्या कॉट्रेलला पंजाबने ८ कोटी ५० लाखांना खरेदी केले आहे. सत्र रद्द झाले तर त्याला त्या रकमेवर पाणी सोडावं लागेल.
-
आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस यादीत शेवटून चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला बंगळुरूने १० कोटींना विकत घेतले असून स्पर्धा रद्द झाली तर त्याचे १० कोटींचे नुकसान होईल.
-
धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल या यादीत शेवटून पाचव्या क्रमांकावर आहे. त्याला पंजाबने १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर संघात घेतले आहे. पण जर स्पर्धाच झाली नाही, तर मॅक्सवेलला ती रक्कम मिळणार नाही.
-
या यादीत खालून सहाव्या क्रमांकावर आहे इंग्लंडचा बेन स्टोक्स. त्याला राजस्थान संघाने २०१८ साली १२ कोटी ५० लाखाला विकत घेतले. तेव्हापासून तो प्रतिसत्र त्या किमतीवर संघाकडून खेळतो, पण सत्र रद्द झाल्यास त्याला ती रक्कम मिळणार नाही.
-
स्टोक्सपेक्षा अधिक नुकसान होईल ते महेंद्रसिंग धोनीचे. धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण चेन्नईकडून खेळण्यासाठी त्याला १५ कोटी रूपये प्रति सत्र दिले जातात. जर स्पर्धा झालीच नाही, तर त्याला पैसे मिळणार नाहीत.
-
IPL 2020 रद्द झाल्यास धोनी आणि रोहित शर्मा हे समदु:खी असतील. रोहितलादेखील मुंबई संघाकडून प्रति सत्र १५ कोटी रूपये मिळतात. त्यामुळे स्पर्धा रद्द झाल्यास तोदेखील धोनीप्रमाणे १५ कोटींना मुकेल.
-
IPL 2020 हे सत्र रद्द झाल्यास सर्वाधिक नुकसान पॅट कमिन्स या परदेशी खेळाडूचे होणार आहे. पॅट कमिन्स हा यंदाच्या लिलाव प्रक्रियेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला कोलकाताच्या संघाने १५ कोटी ५० लाखांना विकत घेतले. त्यामुळे स्पर्धा रद्द झाली तर त्याला त्या पैशांवर पाणी सोडावे लागणार आहे.
-

डोनाल्ड ट्रम्प ९० दिवसांसाठी आयात शुल्कापासून दिलासा देणार? व्हाइट हाऊसचं स्पष्टीकरण…