-
जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा बंद आहेत. बीसीसीआयनेही आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत.
-
त्यामुळे एरवी मैदानावर आपल्या परिवारापासून दूर असणारे भारतीय क्रिकेटपटू सध्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत.
-
कसोटी संघातला मधल्या फळीतला फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी न्यूझीलंड दौरा तितकासा चांगला गेला नाही.
-
भारताने मालिका गमावल्यानंतर पुजाराने तात्काळ भारतात येऊन सौराष्ट्राच्या संघासाठी रणजी फेरीचा अंतिम सामना खेळणं पसतं केलं. अंतिम सामन्यात महत्वपूर्ण खेळी करुन त्याने संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यशंही मिळवलं.
-
मात्र करोनामुळे होम क्वारंटाईन झालेला पुजारा सध्या आपली पत्नी आणि लहान मुलीसोबत घरकामामध्ये रंगलेला दिसत आहे.
-
पुजारा आपल्या पत्नीसोबत मुलीला चित्र रंगवण्यात मदत करताना…
-
मैदानात गोलंदाजांची धुलाई करणारा पुजारा मुलीसोबत खेळताना अगदी लहान होऊन गेला होता…
-
मुलीसोबत असे निवांत क्षण घालवण्याची संधी फार कमी मिळते…त्यामुळे या संधीचा लाभ पुजाराने घेतला नाही तरच नवल
-
एवढं सगळं झाल्यानंतर घराची साफ-सफाई हवी की नको?? मैदानात बॅट घेऊन धुलाई करणारा पुजारा घरात व्हॅक्युमक्लिनर घेऊन आपलं कर्तव्य बजावतोय….

Champions Trophy 2025: एकट्या भारतासाठी सर्व देशांचा दुबई प्रवास; सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी थेट ICC ला विचारला जाब!