-
देशभरात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक आजी-माजी खेळाडू पुढे आले आहेत.
-
दिल्लीचा खासदार गौतम गंभीरने सर्वात प्रथम दिल्लीतील रुग्णालयांसाठी आपल्या खासदार निधीतून ५० लाखांचा निधी दिला. यानंतर आपला महिन्याचा पगार पंतप्रधान सहायनिधीला देत, खासदार फंडातून १ कोटी रुपयेही दिले.
-
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही ५० लाख किमतीचा तांदुळ गरीब आणि गरजू व्यक्तींमध्ये वाटला आहे.
-
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाखांची मदत केली आहे.
-
केदार जाधवने रक्तदान करत आपलं कर्तव्य बजावलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी राज्यात रक्ताचा तुडवडा असल्याचं सांगितलं होतं, यानंतर केदारने हे पाऊल उचललं.
-
-
इरफान आणि युसूफ पठाण या भावांनी आपल्या परिसरात गरजू व्यक्तींना मास्कचं वाटप केलं आहे.
-
५) सुरेश रैना – सुरेश रैना गेल्या काही महिन्यांमध्ये घरच्या मैदानावर फारसं टी-२० क्रिकेट खेळलेला नाही. त्यातच भारतीय संघातली जागाही तो गमावून बसला आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास त्याला भारतीय संघात पुनरागमन करणं अशक्य होईल.
-
महिला क्रिकेटपटू पुनम यादवने २ लाखांचा निधी दिला आहे.
-
मेरी कोमने आपल्या एका महिन्याच्या पगारासह खासदार फंडातील १ कोटी रुपये सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतलाय.
-
हिमा दासनेही आपल्या एका महिन्याचा पगार सहायता निधीला दिला आहे.
-
महिला क्रिकेटपटू रिचा घोषने मुख्यमंत्री सहायता निधीला १ लाखाची मदत केली आहे.
-
पी.व्ही.सिंधूने मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाखांचा निधी दिला आहे.
-
मिताली राजने मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला १० लाखांचा निधी दिला आहे.
-
शिखर धवननेही पंतप्रधान सहायता निधीला मदत केली आहे.
-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही पत्नी अनुष्कासोबत पंतप्रधान सहायता निधीला मदत केली आहे. मात्र नेमकी रक्कम कळू शकलेली नाही.
-
माजी क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपला ३ महिन्यांचा पगार आणि बीसीसीआयचं पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे
-
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसोबत रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांसाठीही निधी दिला आहे. रोहितने ८० लाख रुपये मदतकार्यासाठी दिले आहेत.

Champions Trophy 2025: एकट्या भारतासाठी सर्व देशांचा दुबई प्रवास; सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी थेट ICC ला विचारला जाब!