-
जगात फुटबॉलनंतर सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट… हा खेळ प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे क्रिकेटपटूंबाबतच्या गॉसिपदेखील चाहते चवीचवीने वाचतात.
-
अनेक वेळा क्रिकेटपटू आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची नक्कल म्हणून त्याच्यासारखी हेअरस्टाईल करतात. काही लोक दाढीच्या ठेवणीची नक्कल करतात.
-
चाहत्यांसाठी क्रिकेट हा केवळ खेळापुरता मर्यादित नसतो, तर खेळाडूंचे वैयक्तिक जीवन आणि त्यांची लाईफस्टाईल याकडेही साऱ्यांचे बारीक लक्ष असते.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या कारणास्तव दोन लग्न केली. आज त्याच खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया.
-
जॉन्टी ऱ्होड्स (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्स याने पहिली पत्नी केट मॅकर्थी हिच्याबरोबर १९ वर्षे संसार केला. पण २०१३ मध्ये ते वेगळे झाले. केट ही आफ्रिकेचे महान माजी क्रिकेटपटू कुयॉन मॅकर्थी यांची पुतणी होती. त्यानंतर जॉन्टी ऱ्होड्सने मेलानी हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली. तिच्यापासून त्याला एक मुलगी झाली असून तिचा जन्म भारतात (मुंबई) झाल्याने ऱ्होड्सने तिचे नाव 'इंडिया' असे नाव ठेवले.
-
वसिम अक्रम (पाकिस्तान) – पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमनेही दोन विवाह केले. त्याची पहिली पत्नी हुमा मुफ्ती हिचा आजाराने मृत्यु झाल्यामुळे त्याला दुसरे लग्न करावे लागले. २००९ साली हुमाचा मृत्यु चेन्नई शहरात झाला. त्यानंतर वयाच्या ४८ व्या वर्षी अक्रमने ऑस्ट्रेलियामध्ये जनसंपर्क अधिकारी असलेल्या शानियरा थॉम्पससन हिच्याशी २०१३ मध्ये विवाह केला.
-
मोहम्मद अझरुद्दीन (भारत) – माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही दोनदा लग्न केले आहे. नौरिन यांच्याशी अझरुद्दीन यांचा १९८७ साली विवाह झाला. हा विवाह ९ वर्ष टिकला. त्यानंतर १९९६ मध्ये अभिनेत्री संगिता बिजलानी सोबत त्यांनी विवाह केला. त्यांना एकूण दोन मुले होती. त्यातील अयावुद्दीनचा अपघातात मृत्यु झाला. दुसरा मुलगा असाऊद्दीन हा क्रिकेटर असून त्याने सानिया मिर्झाची बहिणी अनम मिर्झा हिच्याशी दुसरा विवाह केला आहे.
-
इम्रान खान (पाकिस्तान) – पाकिस्तानचा माजी कर्णधार व विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी तीन वेळा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न जेमायमा गोल्डस्मिथ हिच्याशी झाले होते. १९९५ ला त्यांचे लग्न झाले पण पाकिस्तानात जुळवून घेणं कठीण झाल्याने हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर २०१५ मध्ये इम्रान खान यांनी रेहम खान हिच्याशी दुसरे लग्न केले. पण केवळ ९ महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१८ मध्ये इम्रान खान यांनी बुशरा बेबी हिच्याशी तिसऱ्यांदा विवाह केला.
-
ग्रॅम स्मिथ (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ याने ऑगस्ट २०११ मध्ये केप टाऊनमध्ये आयरिश गायिका मॉर्गन डीनबरोबर लग्न केले होते. या दोघांनाही दोन मुले आहेत. मात्र फेब्रुवारी २०१५ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर २ नोव्हेंबर २०१९ रोजी स्मिथने आपली प्रेयसी रोमी लॅन्फ्रांची हिच्याशी लग्न केले.
-
जवागल श्रीनाथ (भारत) – जवागल श्रीनाथने १९९९ मध्ये पहिला विवाह केला. तो जोत्सनाबरोबर विवाहबद्ध झाला, परंतु काही वर्षांनी दोघांच्या संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला. नंतर २००७ मध्ये तो पत्रकार माधवी पत्रावलींबरोबर विवाहबद्ध झाला.
-
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) – महान वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही दोन विवाह केले आहेत. २००२ मध्ये ब्रेट ली एलिजाबेथ केंपबरोबर विवाहबद्ध झाला. पुढे २ वर्षांनी हे जोडपे वेगळे झाले. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा झाला. पुढे २०१४ मध्ये ब्रेट ली याने लॅना अँडरसन हिच्याशी २०१४ मध्ये विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत.
-
योगराज सिंग (भारत) – युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग यांनीही दोन वेळा लग्न केले आहे. भारताकडून १ कसोटी व ६ वनडे सामने खेळलेले योगराज यांनी पहिला विवाह शबनम यांच्याशी केला होता. त्यांना जो मुलगा झाला, तोच युवराज सिंग. पण कालांतराने योगराज आणि शबनम यांच्यात भांडणे होऊ लागली, त्यामुळे ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर योगराज सिंग यांनी सतवीर कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून मुलगा विक्टर तर मुलगी अमरजीत कौर अशी दोन मुले आहेत.
-
विनोद कांबळी (भारत) – विनोद कांबळीने १९९८ मध्ये पुण्यातील हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या नोयला लेविलबरोबर विवाह केला. ती त्याची बालपणीपासूनची मैत्रिण होती. त्यानंतर काही वर्षात हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर कांबळीने मॉडेल असलेल्या अँड्रीया हेविटबरोबर विवाह केला. त्यांना २०१० मध्ये मुलगा झाला.
-
दिनेश कार्तिक (भारत) – दिनेश कार्तिकने १६ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक सामने खेळले, पण तो भारतीय संघात नीटसा स्थिरावू शकला नाही. कृष्णा कुमार दिनेश कार्तिक असे पूर्ण नाव असलेल्या कार्तिकने २००७ मध्ये चेन्नईत बालमैत्रिण निकीता वंजाराशी विवाह केला. पण २०१२ मध्ये निकीताने दिनेश कार्तिकशी घटस्फोट घेत टीम इंडियाचा फलंदाज मुरली विजयशी विवाह केला. त्यानंतर कार्तिकने भारतीय स्कॉशपटू दिपीका पल्लीकल हिच्याशी २०१५ मध्ये विवाह केला.
-
शोएब मलिक (भारत) – पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकची सानिया मिर्झा ही दुसरी पत्नी आहे. शोएबने २००२ मध्ये आयशी सिद्दीकी या महिलेशी विवाह केला होता. याचा खुलासा आयशानेच जेव्हा शोएबने सानियाशी विवाह केला तेव्हा केला होता. तसेच त्यांच्याविरुद्ध केसही दाखल केली होती.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO