-
जगात क्रिकेट हा लोकप्रिय खेळांपैकी एक मानला जातो. हा खेळ प्रचंड लोकप्रिय असल्यामुळे क्रिकेटपटूंबाबतच्या गॉसिपदेखील चाहते चवीचवीने वाचतात. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/इंडियन क्रिकेट टीम)
-
भारतात तर क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळे भारतात तरूणच नव्हे तर तरूणीदेखील क्रिकेटच्या फॅन असल्याचे दिसून येते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/इंडियन क्रिकेट टीम)
-
अनेक तरूणी तर परदेशी क्रिकेटपटूंच्या सर्वात मोठ्या फॅन असतात. परदेशातील क्रिकेटपटूंची स्टाईल आणि त्यांच्या रंग-रूपावर भाळून अनेक तरूणी त्यांच्याशी लग्नगाठ बांधायलाही तयार असतात. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/इंडियन क्रिकेट टीम)
-
पाहूया असे परदेशी क्रिकेटपटू ज्यांनी आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून भारतीय तरूणीची निवड केली आहे.
-
ग्लेन टर्नर – न्यूझीलंड संघाचा माजी फलंदाज ग्लेन टर्नर याने जुलै १९७३ मध्ये सुखींदर कौर गिल यांच्याशी लग्न केले. सुखींदर यांना न्यूझीलंडमध्ये सुख्खी टर्नर या नावाने ओळखले जाते. १९७१ मध्ये ग्लेन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आला होता. त्या दरम्यान ग्लेनची एका पार्टीमध्ये सुखींदरशी भेट झाली. त्यानंतर १९७३ मध्ये त्यांनी लग्न केले होते. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
-
ग्लेन मॅक्सवेल – ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने नुकताच भारतीय गर्लफ्रेंड विनी रामन हिच्याबरोबर साखरपुडा केला आहे. ही बातमी त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती. मॅक्सवेल अनेक वर्षांपासून तिला डेट करत होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/ग्लेन मॅक्सवेल)
-
माइक ब्रेअर्ली – इंग्लंडचा माजी कर्णधार माइक ब्रेअर्लीची माना साराभाई यांच्याशी पहिली भेट १९७६-७७ मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर झाली. माना गुजरातच्या मोठ्या व्यावसायिक गौतम साराभाई यांची मुलगी आहे. लग्नानंतर माना माइकबरोबर लंडनमध्ये स्थायिक झाल्या. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
-
शोएब मलिक – पाकिस्तान संघाचा क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाची पहिली भेट ऑस्ट्रेलियामध्ये झाली. तेथूनच सानिया आणि शोएबच्या प्रेमाला सुरुवात झाली. या दोघांनीही २०१० मध्ये लग्न केले. २०१८ मध्ये सानिया आणि शोएब हे आई-वडील झाले. (इन्स्टाग्राम/सानिया मिर्झा)
-
मुथय्या मुरलीधरन – विक्रमी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने चेन्नईच्या एका नामवंत व्यावसायिकाची मुलगी मधिमलार रामामूर्ती हिच्याशी २००५ मध्ये लग्न केले. मुरलीधरन आणि मधिमलारची पहिली भेट दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखरने करून दिली होती. २१ मार्च २००५ ला या दोघांचे लग्न झाले. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/मधिमलार)
-
शॉन टेट – ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट याने माशूम सिंघा हिच्याशी विवाह केला. या दोघांची भेट २०१० मध्ये टेट राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळत असताना झाली. दोघेही ४ वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर शॉनने माशूमाशी २ जून २०१४ मध्ये विवाह केला. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/शॉन टेट)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”