-
कसोटी क्रिकेट आणि भारतीय खेळाडूंचं विशेष नातं आहे…खासकरुन सामने भारतीय मैदानांवर असतात त्यावेळी भारतीय फलंदाज अक्षरशः धावांचा पाऊस पाडतात.
-
परदेशातही भारतीय खेळाडूंची कामगिरी फारशी उल्लेखनीय नसली तरीही आश्वासक नक्कीच राहिलेली आहे.
-
आज आपण कसोटीत दोन्डी डावांत शतक झळकावण्याची किमाय करणाऱ्या ६ भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
१) विजय हजारे – १९४८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात विजय हजारे यांनी दोन्ही डावांत शतकं झळकावली होती. ऑस्ट्रेलियाच्या ६७४ धावांना उत्तर देताना, हजारे यांनी पहिल्या डावात ११६ तर दुसऱ्या डावात १४५ धावांची खेळी केली.
-
-
३) राहुल द्रविड – द वॉल या नावाने ओळखला जाणाऱ्या द्रविडने आपल्या कारकिर्दीत दोनवेळा कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावण्याची किमया केली आहे. १९९९ साली न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन कसोटी सामन्यात द्रविडने पहिल्या डावात १९० तर दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या होत्या. हा सामना भारतीय संघाने अनिर्णित राखला……
-
यानंतर २००५ साली पाकिस्तानविरुद्ध कोलकाता कसोटी सामन्यात द्रविडने पहिल्या डावात ११० तर दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या.
-
-
५) अजिंक्य रहाणे – २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिल्ली कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने दोन्ही डावांत शतकं झळकावली होती. पहिल्या डावात १२७ तर दुसऱ्या डावात नाबाद १०० धावा केल्या. या सामन्यात भारताने आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला होता.
-
६) रोहित शर्मा – रोहित शर्माने २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम कसोटी सामन्यात अशी कामगिरी करुन दाखवली होती. सलामीच्या जागेवर संधी मिळालेल्या रोहितने पहिल्या डावात १७६ धावा केल्या, तर दुसऱ्या डावातही रोहितने आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करत १२७ धावांची खेळी केली. भारताने हा सामना २०३ धावांनी जिंकला होता.

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली