-
क्रिकेट म्हटलं की सामान्यत: चाहत्यांच्या डोळ्यापुढे येतं ते पुरूषांचं क्रिकेट. महिला क्रिकेट हे अनेकदा दुर्लक्षितच राहतं.
-
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / एलिस पेरी
-
असे असले तरी काही महिला क्रिकेटपटू आपल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर क्रीडाविश्वात आपला ठसा उमटवतात.
-
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / एलिस पेरी
-
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / एलिस पेरी
-
'विस्डन'ने नुकतीच सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंची नावं जाहीर केली आहेत. त्यात चार पुरूष क्रिकेटपटूंसह एका महिला क्रिकेटपटूनेही स्थान मिळवले आहे.
-
यंदा महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी ती महिला म्हणजे ऑस्ट्रेलियाची सौंदर्यवती क्रिकेटपटू एलिस पेरी…
-
आपल्या शानदार खेळीच्या जोरावर एलिस पेरीने हा मानाचे स्थान पटकावले.
-
एलिसला २०१९ च्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणूनही घोषित करण्यात आले होते.
-
अष्टपैलू एलिस पेरी हिने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये मिळून ९७.८७ च्या सरासरीने एकूण ७८३ धावा केल्या आहेत.
-
गोलंदाजीतही एलिसने दमदार कामगिरी करत २८ बळी टिपले.
-
टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेत एलिस पेरीने धडाकेबाज कामगिरी केली, पण दुर्दैवाने तिला स्पर्धेच्या मध्यातच दुखापतग्रस्त व्हावे लागले.
-
एलिसने २२ जुलै २००७ ला न्यूझीलंडविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
-
अथक परिश्रम करून एलिसने महिला क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले
-
ऑस्ट्रेलियाकडून एलिसने आतापर्यंत ११२ एकदिवसीय सामन्यात ३ हजारांहून अधिक धावा आणि १५२ बळी टिपले आहेत.
-
टी २० क्रिकेटमध्येही एलिसने १११ सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले असून त्यात तिने १ हजाराहून अधिक धावा आणि १०६ बळी टिपले.
-
एलिसने कसोटी क्रिकेटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. ऑस्ट्रेलियाकडून तिने ८ कसोटी सामने खेळले आहेत.
-
कसोटी क्रिकेट कारकिर्दीत एलिसने १३ डावात ६२४ धावा केल्या आहेत. त्यात एक दमदार द्विशतकदेखील सामील आहे.
-
कसोटी गोलंदाजीतही तिने ३१ बळी टिपले असून नुकत्याच झालेल्या महिला अॅशेसमध्ये तिने संघाला विजय मिळवून दिला आहे.
-
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / एलिस पेरी

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी