-
भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू लोकेश राहुलने आज वयाच्या २८ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.
-
फार कमी कालावधीत राहुलने कसोटी, वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपलं स्थान पक्क केलं.
-
२०१९ च्या अखेरीस कामगिरी ढासळल्यामुळे लोकेशला आपलं कसोटी संघातलं स्थान गमवावं लागलं. मात्र त्यानंतर हार न मानता राहुलने नव्या वर्षात दमदार पुनरागमन केलं.
-
सध्याच्या घडीला राहुल फलंदाजीसोबत वन-डे, टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळतो आहे.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुलच्या नावावर असलेले अनोखे ३ विक्रम आज आपण पाहणार आहोत.
-
१) वन-डे पदार्पणात शतक झळकावणारा एकमेव भारतीय फलंदाज – २०१६ साली झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात राहुलने ही कामगिरी करुन दाखवली होती.
-
२) आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय – २०१७ च्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना राहुलने १४ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.
-
३) तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तिसरा भारतीय – राहुलने आतापर्यंत कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. भारताकडून याआधी सुरेश रैना, रोहित शर्माने अशी कामगिरी केली आहे.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी