-
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित केलं आहे. भारतीय संघाचे क्रिकेटपटू सध्या आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत ( सर्व छायाचित्र – साक्षी धोनी इन्स्टाग्राम अकाऊंट )
-
महेंद्रसिंह धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत आपल्या रांची इथल्या फार्म हाउसमध्ये क्वारंटाइन झाला आहे
-
२०१९ विश्वचषकानंतर धोनीला भारतीय संघात जागा मिळालेली नाहीये.
-
रांचीत धोनीच्या राहत्या घरापासून अवघ्या २० मिनीटांवर कैलासपती भागात हे अलिशान फार्महाउस आहे.
-
धोनी सध्याच्या काळात आपल्या मुलीसोबत अधिकाधिक वेळ घालवत आहे.
-
या फार्महाउसमध्ये धोनीवर आपल्या बागेतलं गवत कापण्याची जबाबदारी आली होती. ती त्याने समर्थपणे पेलली.
-
स्वत:प्रमाणेच आपल्या कारचीही कशी निगा राखायची, याचे धडे धोनी झिवाला आतापासून देत आहे.
-
घरासमोर प्रशस्त जागा, सर्व प्रकारची झाडं आणि हिरवळ हे धोनीच्या फार्महाउसचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.
-
तब्बल ७ एकराच्या जागेवर धोनीचं हे अलिशान फार्महाउस उभारलेलं आहे.
-
धोनीला आवडणारी झाडं आणि इतर सर्व गोष्टींचा हे फार्महाउस बांधताना विचार करण्यात आला आहे.
-
सकाळी इथलं दृष्य हे पाहण्यासारखं असतं
-
धोनीची पत्नी साक्षीने आपल्या या फार्महाउसचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
धोनी काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी चेन्नईला गेला होता. मात्र करोनामुळे आयपीएल अनिश्चीत काळासाठी स्थगित झाल्यामुळे तो घरी परतला आहे.
-
झिवासोबत खेळण्यासाठी इथे दोन खास कुत्रेही आहेत.
-
संध्याकाळी धोनी साक्षी आणि झिवासोबत फिरायला बाहेर पडतो.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ